Dainik Maval News : आंदर मावळ विभागात असलेल्या आंध्रा धरण लगत असलेल्या बेलज गावातील दीक्षा प्रवीण ओव्हाळ या पंधरा वर्षीय मुलीचा आंध्रा धरणात बुडून मृत्यू झाला आहे. युवतीचा पाय घसरल्यामुळे ती धरणाच्या पाण्यात पडली व बुडुन मृत्यू झाला, अशी माहिती वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या जीवरक्षकांकडून देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा संस्था या संस्थांचे सदस्य घटनास्थळी आले. त्यांनी आंध्रा धरण जलाशयात शोध मोहीम राबवून सदर युवतीचा मृतदेह बाहेर काढला. शवविच्छेदनासाठी मृतदेह तळेगाव येथे दाखल करण्यात आला. पुढील तपास वडगाव मावळ पोलीस स्टेशन कडून करण्यात येत आहे.
वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा, आपदा मित्र मावळ संस्थांचे निलेश गराडे, अनिल आंद्रे, शुभम काकडे, अनिश गराडे, विनय सावंत, गणेश गायकवाड, कुंदन भोसले, आकाश ओव्हाळ यांनी शोधकार्यात सहभाग घेतला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राज्यातील सहा जिल्ह्यांसह पुणे घाट माथ्यावर पावसाचा रेड अलर्ट ; पवना धरणातून नदीपात्रात 4400 क्युसेक विसर्ग सुरू
– मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळ कोसळलेली दगड, झाडी हटविली ; वाहतूक पूर्ववत झाल्याने प्रवाशांना दिलासा
– सर्पमित्रांना स्वतंत्र ओळखपत्र, कुटुंबियांना १५ लाखांचा अपघाती विमा आदी मागण्यांबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार
– उपवास म्हणजे काय? तो का आणि कसा करावा? श्रावण मासात उपवासाचे महत्व, साबुदाणा खिचडी उपवासाला खरंच चालते का ? प्रत्येकाने वाचावा असा लेख