ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे दुःखद निधन झाले आहे. रुग्णालय प्रशासन आणि त्यांचे कुटुंबीय यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. विक्रम गोखले यांनी वयाच्या 77व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. ( Veteran Actor Vikram Gokhale Passes Away At Age 77 In Pune )
आज ( शनिवार, 26 नोव्हेंबर ) सायंकाळी त्यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशान भूमीत अंत्यसंस्कार होणार आहे. तत्पुर्वी चार वाजता बालगंधर्वमध्ये अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात येईल.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अभिनेते विक्रम गोखले यांची तब्येत खालावल्याने मागील अनेक दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. तसेच दहा ते बारा दिवसांपासून आयसीयूत त्यांच्यावर उपचार चालू होते. विक्रम गोखले यांच्या जाण्याने कलाक्षेत्रावर दुःखाचा डोंगर कोसळला असून दिग्गज अभिनेत्याला अनेक क्षेत्रातून श्रद्धांजली वाहिली जात आहे.
विक्रमकाका, तुमची उणीव भासत राहील!
जेव्हा जेव्हा कुणी अभिनेता
कॅमेराला डबल लूक देईल ,
जेव्हा जेव्हा फक्त देहबोलीतून
पानभर संवाद बोलला जाईल
जेव्हा जेव्हा घेतलेल्या पाॅज मधूनही
अचूक अर्थ पोहोचवला जाईल
जेव्हा जेव्हा एन्ट्रीच्या थाटावरून
पात्राची पूर्ण पार्श्वभूमी उभी राहील + pic.twitter.com/KstLF71DFl— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) November 26, 2022
नाटक, चित्रपट आणि मालिका या तीनही माध्यमात आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवणारे दिग्गज अभिनेते, ज्येष्ठ कलाकार विक्रमजी गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली. #विक्रमगोखले #श्रद्धांजली #VikramGokhale pic.twitter.com/X8BlitM3Ju
— Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar) (@ChitraKWagh) November 26, 2022
विक्रम गोखले यांनी टीव्ही सीरियल, बॉलिवूड, मराठी सिमेमांना अनेका भूमिका गाजवल्या आहेत. व्यासंगी अभिनेते म्हणून त्यांची वेगळी ओळख होती. प्रत्येक चित्रटात त्यांनी मिळेल त्या भूमिकेला योग्य न्याय देण्याचा नेहमीच प्रयत्न केला. मात्र घशाच्या त्रासामुळे त्यांनी अभिनयातून संन्यास घेतला होता.
विक्रम गोखले यांना 2013 साली प्रदर्शित झालेल्या अनुमती या चित्रपटातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारानेही त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. ( Veteran Actor Vikram Gokhale Passes Away At Age 77 In Pune )
अधिक वाचा –
– 26/11 – मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला 14 वर्षे पूर्ण… ती एक काळ रात्र होती, शेकडो मृत्यू अनेकजण जखमी
– संविधान दिन 26 नोव्हेंबर रोजीच का साजरा केला जातो? वाचा भारतीय संविधानाची 9 मुख्य वैशिष्ट्ये । Constitution Day