पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सहाय्यक आयुक्त विजयकुमार सरनाईक यांची पुन्हा एकदा तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी (सीईओ) पदी बदली झाली आहे. तर, विद्यमान मुख्याधिकारी एन.के.पाटील यांची पिंपरी महापालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून बदली झाली आहे. याबाबतचे आदेश शुक्रवारी शासनाने काढले आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी असलेले सरनाईक यांची 21 एप्रिल रोजी मुदतपूर्व बदली झाली होती. सोलापूरला सहआयुक्त (जिल्हा प्रशासन) पाटील यांच्या जागी सरनाईक यांची बदली झाली होती. तर पाटील यांची बदली तळेगाव येथे सीईओ म्हणून नगरविकास विभागाने केली होती. पण, सरनाईक सोलापूरला रुजू झाले नाहीत. त्यानंतर त्यांची पिंपरी महापालिकेत बदली झाली. ( Vijayakumar Sarnaik has been appointed as CEO of Talegaon Dabhade Municipal Council )
एन.के.पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या सात महिन्यांपासून मुलभूत नागरी सुविधांही मिळत नसल्याने तळेगाव शहरातील हैराण झाल्याची चर्चा होती. तसेच नगरपरिषदेच्या कारभारातही विस्कळीतपणा आल्याने आमदार सुनिल शेळके यांच्यासह नागरिकांनी पाटील यांच्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवला होता. समस्यांसाठी नागरिकांनी उपोषणही केले होते. अखेरीस शुक्रवारी पाटील यांची पिंपरी महापालिकेत बदली झाली. तर, त्यांची जागी पुन्हा सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अधिक वाचा –
– सुदुंबरेतील श्री संत जगनाडे महाराज समाधीस्थळ विकास आराखड्यासाठी 66 कोटींचा निधी
– मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तळेगाव शहराध्यक्षपदी संतोष भेगडे; वरिष्ठ उपाध्यक्षपदी गणेश काकडे
– आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून सुदुंबरेतील ठाकर वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामास सुरुवात