Dainik Maval News : परमपूज्य सद्योजत शंकराश्रम स्वामीजी यांचे येथील महर्षी कर्वे आश्रम शाळेत स्वागत करण्यात आले. उत्तर कर्नाटकातील शिरालीतील श्री चित्रपूर मठाचे अकरावे प्रमुख परमपूज्य सद्योजत शंकराश्रम स्वामीजी यांसह त्यांचे भक्तगण आणि अनुयायांचे शाळेत स्वागत करण्यात आले.
संस्थेचे उपसचिव प्रदीप वाजे, अभय कुलकर्णी, प्रभाकर सोनपाटकी, शाळा समिती सदस्य धनंजय वाडेकर, विक्रम बाफना, संपर्क मंडळ सदस्य नवनाथ ठाकर, महेश शेट्टी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक बुरांडे पवार, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनींच्या उपस्थितीत भजन व टाळ मृदंगाच्या गजरात स्वामीजींचे भव्य स्वरूपात स्वागत करण्यात आले.
विद्यार्थिनींच्या संपूर्ण नवदुर्गा स्तोत्रा ने सर्व सभागृहाला मंत्रमुग्ध केले. परमपूज्य स्वामीजींनी आपल्या अधिकारवाणीने मार्गदर्शन केले. मातृभाषेसोबत इंग्रजी त्याचबरोबर आपली संस्कृत भाषा ही शिकण्याची गरज समजावून सांगितली.
जीवनाचे महत्त्व उद्देश व यथोचित सार स्वामीजींनी उद्धृत केला. आयुष्यातील यशस्वीततेसाठी कार्य मग्नता व सातत्याने प्रयत्न आवश्यक आहे हे सांगितले. स्वधर्माचा अभिमान कसा असावा हे विविध उदाहरणे देऊन सांगितले. सर्वांनी संघटित होऊन कार्य करू असा विश्वास स्वामींनी दिला.
कार्यक्रमाची सांगता स्वामीजींच्या शिवोहम, पसायदान व परम पूज्य शंकराश्रम स्वामींच्या दर्शनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली हेमाडे व तनुजा लांघी या विद्यार्थिनींनी केले. सर्व उपस्थितांचे आभार प्रकल्प समन्वयक दत्ता जाधव यांनी मानले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके यांना भेटण्यासाठी मावळच्या कानाकोपऱ्यातून नागरिकांची गर्दी, महिला वर्गाची लक्षणीय उपस्थिती
– नवनिर्वाचित आमदार शंकरभाऊ मांडेकर यांनी घेतली आमदार सुनिल शेळके यांची भेट । Talegaon Dabhade
– स्तुत्य उपक्रम ! वडगाव मावळ शहरातील सर्व अंगणवाडी केंद्रातील ४५५ विद्यार्थ्यांना उबदार स्वेटर भेट । Vadgaon Maval