महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबईत सुरु आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प दिनांक 9 मार्च (गुरुवार) रोजी राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. यावेळी फडणवीस यांनी अर्थसंकल्पातून राज्यातील महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत असेल, अशी घोषणा केली होती.
त्यानुसार आता दिनांक 17 मार्चपासून म्हणजे आजपासून (शुक्रवार) राज्यात महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बस तिकीट भाड्यात 50 टक्के सवलत योजना अमंलबजावणी सुरू करण्यात आली आहे. ( Women Will Get 50 Percent Discount On All Types Of ST Bus Ticket Fare In Maharashtra Shinde Fadanvis Govt Scheme Implementation Started )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बस तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने दिनांक 17 मार्च 2023 पासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात महिला सन्मान आली आहे. या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर योजना म्हणून ओळखले जाईल. या योजनेची प्रतिपुर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणारं आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिली.
महिला सन्मान योजना pic.twitter.com/qIE9WsRJQU
— Maharashtra State Road Transport Corporation (@msrtcofficial) March 17, 2023
राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना 33 टक्के पासून 100 टक्के पर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते. यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त राज्य शासनाने 75 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून “मोफत” प्रवासाची सवलत जाहीर केली होती. तसेच 65 ते 75 वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या दोन्ही घटकांना एसटीच्या प्रवासी भाड्यात सवलत दिली जाते, अशी माहिती एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिली.
अधिक वाचा –
– येळसे गावात वीज कोसळून जनावरांसाठी साठवलेला चारा जळून खाक, अवकाळी पावसामुळे पवनमावळातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
– मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आढे गावाच्या हद्दीत अत्यंत भीषण अपघात, तीन जण जागीच ठार