क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शासन मान्य क्रीडा स्पर्धांची सुरुवात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेने झाली. तालुका स्तरावर कुस्ती, मैदानी, हॉलीबॉल,कबड्डी, खो-खो आणि बुद्धिबळ या खेळाचे आयोजन करण्यात येते, त्यापैकी कुस्ती या खेळाने खोपोली येथील कारमेल स्कूल येथे सुरुवात झाली, असे शासन मान्य क्रीडा स्पर्धेचे खालापूर तालुका क्रीडा समन्वयक जगदिश मरागजे यांनी उदघाटन कार्यक्रमासमयी सांगितले. ( Wrestling Tournament At Khopoli Raigad )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या समयी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर निर्मल मारिया, के टी एस पी चे कार्यवाह किशोर पाटील शिवछत्रपती पुरस्कार विजेते मारुती आडकर, रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष सुभाष घासे, उप मुख्यध्यपिका सिस्टर आयविन, खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे खजिनदार जितेंद्र सकपाळ, राज्यस्तरीय पंच राजाराम कुंभार, श्री पायमोडे, भरत शिंदे, सुधाकर थळे, क्रीडा शिक्षक समीर शिंदे,अमित विचारे, धनश्री गौडा,जयश्री नेमाने,विनोद जाधव,श्री भल्ला आदी मान्यवर उपस्थित होते.
तालुका स्तरावर विजयी खेळाडूंची जिल्हा स्तरावर निवड होणार आहे. गेली दोनवर्षं कोविड प्रादुर्भाव असल्याने स्पर्धा झाल्या नव्हत्या परत एखादा स्पर्धा सुरू झाल्याने खेळाडू आणि क्रीडा शिक्षकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, क्रीडा अधिकारी सचिन निकम , राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या व आयोजकांचे अभिनंदन केले आहे.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! राज्यातील तब्बल 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर, थेट जनतेतून सरपंच, वाचा कार्यक्रमपत्रिका
– कार्तिकी यात्रेनिमित्त मावळ तालुक्यामधून आळंदीकडे प्रवास करणाऱ्या पायी दिंड्यांना पोलिस संरक्षण मिळावे – गुलाबकाका म्हाळसकर