Dainik Maval News : साहित्य अकादमीच्या जाहीर झालेल्या प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये मराठी साहित्यातील दोन साहित्यिकांचा समावेश आहे. लेखक प्रदीप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळी डोळे’ या कादंबरीला साहित्य अकादमी युवा पुरस्कार २०२५ तर कवी सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ या कवितासंग्रहाला साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
या पुरस्काराबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही साहित्यिकांचे अभिनंदन केले आहे. लेखक प्रदीप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळी डोळे’ या कादंबरीने मराठी साहित्यातील युवा लेखकांच्या संवेदनशील आणि प्रभावी लेखनाची चुणूक दाखवली आहे. तर कवी सुरेश सावंत यांचा ‘आभाळमाया’ हा कवितासंग्रह बाल साहित्यातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाचा दाखला आहे.
मराठी साहित्याच्या क्षेत्रात मोलाची भर घालणाऱ्या प्रदीप कोकरे आणि सुरेश सावंत यांचे या यशाबद्दल मन:पूर्वक अभिनंदन करतानाच त्यांच्या साहित्य प्रवासाला यश मिळो, अशा शुभेच्छा उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील वाहतूक मार्गात मोठे बदल – लगेच चेक करा
– धोकादायक पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवा, पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या ; राज्याच्या मुख्य सचिवांचे निर्देश
– PHOTO : विठ्ठलाच्या भेटीला जगद्गुरू निघाले… देहूनगरीतून तुकोबारायांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; पहिला मुक्काम इनामदार वाड्यात
– तळेगाव दाभाडेपासून उरुळीकांचनपर्यंत नवीन लोहमार्ग केला जाणार ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती । DCM Ajit Pawar