तळेगाव दाभाडे शेजारील इंदोरी गावच्या (ता. मावळ) हद्दीत स्मशानभूमी जवळ इंद्रायणी नदीच्या डोहात पुलावरून उडी मारून एका अनोळखी व्यक्तीने आत्म’हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मंगळवार (दि. 20) रोजी हा प्रकार समोर आला. या व्यक्तीने पुलावरून खाली पाण्यात उडी मारली आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. अथक प्रयत्नांनतर आपदा मित्र आणि पोलिसांकडून त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. परंतू त्याची ओळख पटली नाही. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
सदर व्यक्ती तरुण असून त्याची दाढी वाढलेली आहे. तसेच अंगावर काळ्या रंगाचा टीशर्ट आणि काळ्या रंगाची जिन्स परिधान केलेली आहे. सदर व्यक्तीला कोणी ओळखत असेल अथवा कुणी नातेवाईक असल्यास पोलिस प्रशासनाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अथवा पी.आर. रेळेकर पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार आंबेकर (9823381605) पोलीस हवालदार सोरटे (9552542854) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Youth committed suicide by jumping into Indrayani river Maval Taluka)
अधिक वाचा –
– टाकवे येथील श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीला दीड किलो चांदीचे अलंकार अर्पण । Maval News
– कान्हे सोसायटीच्या चेअरमनपदी मावळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष किशोर सातकर यांची निवड । Maval News
– हृदयद्रावक घटना! द्रुतगती मार्गावरील कार अपघातात तळेगावमधील एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू, 5 जखमी । Accident on Mumbai Pune Expressway