खंडणीसाठी एका 18 वर्षीय तरुणाचे अपहरण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण शिक्षण घेत असून तो कात्रज भागात राहत आहे. सोमवारी सायंकाळी 6 वाजता तो घरातून बाहेर गेला. परंतू रात्री उशिरापर्यंत घरी परत आला नाही. त्यानंतर रात्री उशिरा या तरुणाच्या मोबाईलवरुन घरातील लोकाना फोन आला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
फोनवरुन शिवीगाळ करीत मुलाला जिवंत बघायचे असेल तर खात्यात 30 हजार रुपये टाका, अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर पैसे टाकल्याच्या 1 तासामध्ये मुलाला सोडण्यात येईल. कुठल्या प्रकारचा रिपोर्ट केला तर मुलाची अपेक्षा सोडून द्या. एका तासामध्ये पैसे आले तर ठिक, असे धमकावले., असे धमकावण्यात आले. (Youth kidnapped for ransom from Katraj escape at lonavala)
मुलाचे अपहरण झाल्याचे समजताच घरातील सदस्यांनी भारती विद्यापीठ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. तेव्हा हा तरुण लोणावळा येथे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांचे एक पथक लोणावळ्यात पोहोचले. त्यांनी तरुणाची सुटका केली आणि त्याला पुण्यात आणले आहे. सध्या भारती विद्यापीठ पोलीस तरुणाची आणि प्रकरणाची चौकशी करत आहे.
अधिक वाचा –
– आरोग्य विभागातील 10 हजार 949 रिक्त पदांची भरती प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू – आरोग्य मंत्री तानाजी सावंत
– मावळात खरेदी विक्री संघाच्या निवडणूकीतून दिसणार महायुतीची ताकद! 19 पैकी 10 जागा आधीच बिनविरोध । Maval Taluka Kharedi Vikri Sangh
– मोठी बातमी! कामशेतजवळील अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 10 जण ताब्यात, 11 लाखांचा मुद्देमाल जप्त । Maval Crime News