तळेगाव दाभाडे शहरातील गुन्हेगारी काही थांबताना आणि कमी होताना दिसत नाही. चालू वर्षात तळेगाव शहरात अनेकवेळा गोळीबाराच्या घटना घडल्या. त्यातही गेल्या आठवड्यात झालेल्या गोळीबाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील रहदारीच्या चौकांमध्ये हवेत गोळीबार करण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकारानंतर तातडीने तपास करत आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून पिस्तूले आणि काडतूसे जप्त केली आहेत. त्यानंतर आता आणखीन एका युवकाकडे पिस्तूल मिळून आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सोमवारी (दि. 24 जून) दुपारच्या सुमारास तळेगाव दाभाडे शहरातील लिंब फाट्यासमोरील सुशीला मंगल कार्यालय येथे पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट 5 चे पोलिस हवालदार दत्तात्रय बनसुडे (वय 26) यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोहित उर्फ बंटी महेंद्र आगळे (वय 26, रा. तळेगाव दाभाडे) याला पोलिसांनी पिस्तूलासह ताब्यात घेतले असून त्याच्यावर प्राप्त फिर्यादीनुसार भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3 (5) सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 37 (1) (3) सह 135 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( youth was arrested with pistol in Talegaon Dabhade )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी लिंब फाटा येथून आरोपीला ताब्यात घेतले असता त्याच्याजवळ 40 हजार रूपये किंमतीचे एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल तसेच 2 हजार रुपये किमतीची 2 जिवंत काडतूसे मिळून आली आहे. विनापरवाना, बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याने त्यास ताब्यात घेतले असून पुढील तपास पोउपनि कोकाटे हे करत आहेत.
अधिक वाचा –
– आमदारसाहेब..! मावळ तालुक्यातील जलजीवन मिशनची अपूरी कामे आणि रस्त्यांच्या कामातील भ्रष्टाचारावर अधिवेशनात आवाज उठवा
– शिंदे सरकारचा मोठा निर्णय ! आता पीक कर्ज मिळवताना ‘ही’ अट नसणार ; अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना होणार फायदा
– श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या तैलचित्राचे अनावरण । Khashaba Jadhav