फुफ्फुसात दुर्मिळ अशी कर्करोगाची गाठ असणाऱ्या एका 23 वर्षीय तरूणावर उपचार करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. तळेगाव दाभाडे येथील टीजीएच – ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये सदर रूग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
पुणे येथे राहणारे रमेश सावंत (नाव बदललेलं) यांना अनेक दिवसांपासून कोरडा खोकला, अशक्तपणा आणि श्वास घ्यायला त्रास जाणवत होता. स्थानिक डॉक्टरांकडून उपचार घेतले. परंतु, प्रकृतीत फारसा फरक पडला नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार छातीचा एक्स-रे काढला. त्या मध्ये रूग्णाच्या डाव्या फुफ्फुसात एक मोठी गाठ (ट्यूमर) असल्याचे निदान झाले. या रूग्णाला पुढील उपचारासाठी तळेगाव येथील टीजीएच ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटरमध्ये पाठविण्यात आले. या ठिकाणी सर्जिकल आणि थोरॅसिक ऑन्कोलॉजिस्ट डॉ. जयपाल रेड्डी यांच्या देखभालीखाली उपचार सुरू झाले. ( Youth With Rare Lung Tumor Underwent Successful Surgery at TGH Onco Life Cancer Center By Dr Jaipal Reddy In Talegaon Dabhade )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सुरूवातीला त्याच्या छातीचा सीटी स्कॅन आणि नंतर पेट स्कॅन (PET SCAN) करण्यात आला. पेट स्कॅनमधे डाव्या फुफ्फुसामधे खालच्या भागात (Lower Lobe) एक ट्यूमर आढळून आला. तो ट्यूमर फुफ्फुसाच्या तेवढ्याच भागात (Lower Lobe) मर्यादित असून शरीरामध्ये इतरत्र पसरलेला न्हवता.
सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. जयपाल रेड्डी ज्यांना दुर्बीण वापरून कर्करोगाच्या शस्त्रक्रिया करण्यातही प्राविण्य आहे. ते म्हणाले की, “रूग्णाचे सर्व निदान झाल्यानंतर (पेट स्कॅन, बायोप्सी) डाव्या फुफ्फुसात 6 x 5 सेमी आकाराचा ट्युमर होता. फुफ्फुसातील ही गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रियेची ( Lower Lobectomy) आवश्यकता होती. फुफ्फुसातील ही गाठ काढण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीची (थोरॅकोस्कोपिक ) शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया लहान चिरा वापरून केली जाते. ज्यामुळे रुग्णाला कमी वेदना होतात आणि रुग्णाला लवकर बरे होण्यास मदत होते.”
हेही वाचा – तळेगाव दाभाडे शहरातील पाण्याची समस्या लवकरच दूर होणार, युद्ध पातळीवर पाणी योजनेचे काम सुरु
“शस्त्रक्रियेनंतर रूग्णाच्या प्रकृतीत सुधारणा पाहून चौथ्या दिवशी डिस्चार्ज देण्यात आला. हिस्टोपॅथॉलॉजीच्या अहवालात ग्लोमस ट्यूमर हा फुफ्फुसाचा एक अत्यंत दुर्मिळ प्रकारचा ट्यूमर आढळुन आला . जगामध्ये अशा प्रकारच्या कॅन्सरचे 50 पेक्षाही कमी केसेस नोंदवले गेले आहेत,” अशी डॉ जयपाल रेड्डी यांनी माहिती दिली. सदर शस्त्रक्रियेसाठी डॉ. नरेश चव्हाण, डॉ. नयना चेपुरे, डॉ. रुतुजा गोरे, डॉ. अनिरुद्ध आणि डॉ. दीपा पुणतांबेकर या डॉक्टरांनी मोलाचे योगदान दिले.
रूग्ण रमेश सावंत म्हणाले की, “कोणतही काम करताना मला अशक्तपणा आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. चाचणी अहवालात माझ्या फुफ्फुसात कर्करोगाची गाठ असल्याचे निदान झाले. कर्करोग म्हटल्यावर मी खूप घाबरून गेलो होतो. परंतु टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरच्या डॉक्टरांच्या टीमने मला योग्य प्रकारे समुपदेशन केले ज्यामुळे मला धीर मिळाला. तातडीने उपचार केल्याने मला नवीन आयुष्य मिळाले आहे. माझे प्राण वाचवल्याबद्दल मी डॉक्टरांचे आभार मानतो.”
अधिक वाचा –
– दुचाकीस्वाराला धडक देत गंभीर जखमी करुन चारचाकी चालक फरार; तळेगाव दाभाडेतील धक्कादायक प्रकार
– दैनिक मावळ विशेष । आठ हजारहून अधिक सरपंच, ग्रामसदस्यांना वक्तृत्व कौशल्याचे धडे देणारे मावळरत्न ‘विवेक गुरव’