साधारणतः जिल्हा परिषदेच्या शाळा म्हटलं की किमान गावखेड्यात त्या मोडकळीस आलेल्या, रंग उडालेल्या असं सर्वसाधारण चित्र डोळ्यांसमोर दिसतं. आजही अनेक भागात ही परिस्थिती आहे. परंतू, मावळ तालुक्यातील दारुंब्रे गावातील शाळा या सगळ्याला अपवाद आहे, आणि नुसती अपवाद नाही तर अन्य शेकडो शाळांसाठी आता ती आदर्श देखील आहे. याचे कारण दारुंब्रे शाळेतील फक्त विद्यार्थीच नाही, तर येथील भिंती देखील आता शिक्षणाचे गीत गाऊ लागल्या आहेत.
मावळ तालुक्यातील दारुंब्रे गावातील जिल्हा परिषद शाळेच्या डागडुजीसाठी सुमारे अकरा लाख निधीतून विविध कामे करण्यात आली आहे. शाळेच्या वर्ग खोल्या दुरुस्तीसह रंगकाम, भिंतीवरील चित्रे, स्वच्छतेची कामे केल्याने शाळेचे अंतर्बाह्य रुप पूर्णपणे बदलले आहे. त्यामुळे ही शाळा आता ‘बोलकी शाळा’ बनली आहे. ( Zilla Parishad Primary School Darumbre Maval Taluka )
शाळेच्या भिंतीवर गणित, भूगोल, इतिहास, सामान्य ज्ञान इ. विषयातील मुद्दे घेऊन रेखाटने करण्यात आली आहेत. शाळेत येता जाता या रेखाटलेल्या चित्रांकडे विद्यार्थ्यांचे लक्ष जात असल्याने त्याबद्दलचे कुतुहल त्यांच्या मनात नक्कीच वाढते. ‘विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच शाळेतील वातावरण शिक्षणास पूरक असायला हवे. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षणामध्ये अधिक गोडी निर्माण करण्यासाठी हा उपक्रम तालुक्यातील इतर शाळांमध्ये पुढील वर्षभराच्या काळात पुर्ण करण्याचा प्रयत्न असेल,’ असे आमदार सुनिल शेळके यांनी सांगितले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– अरे व्वाह…!! मावळ तालुक्यातील ‘या’ गावात अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण
– दादांचा विश्वास कायम! मावळ तालुक्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत सचिन घोटकुले यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड
– आमदार सुनिल शेळकेंनी घेतला पवन मावळमधील पूर्व भागातील गावांच्या विकासकामांचा आढावा; शनिवारी काले इथे बैठक