Dainik Maval News : देशाचा 78 वा स्वातंत्र्यदिन सोहळा मावळ तालुक्यातील आदर्श केंद्र शाळा कान्हे येथे अत्यंत उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला. जिल्हा परिषद शाळा कान्हे याठिकाणी “घरोघरी तिरंगा” या उपक्रमांतर्गत दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2024 असे सलग तीन दिवस ध्वजारोहण सोहळा आयोजात केलेला होता. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी कान्हे ग्रामपंचायत कर्मचारी आणि शाळा व्यवस्थापन समितीचे क्रियाशील सदस्य सचीन वीरकर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. बुधवारी दिनांक 14 ऑगस्ट रोजी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व कान्हे ग्रामपंचायतचे पाणीपुरवठा विभाग प्रमुख कोंडीबा सातकर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ( Zilla Parishad School Kanhe Village celebrated Independence Day with enthusiasm )
गुरुवारी, दिनांक 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समीर सातकर यांचे हस्ते ध्वजपूजन आणि ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेतील सहशिक्षिका संगिता मधे यांनी सर्वांना ध्वज प्रतिज्ञा दिली. सदर कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी, शिक्षक, महिला व पालक तसेच सरपंच व सर्व ग्रामस्थमंडळी, सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, महिला बचत गट मंडळे, ज्येष्ठ नागरिक, आजीमाजी पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते.
कान्हे केंद्राच्या केंद्रप्रमुख तथा विस्तार अधिकारी निर्मला काळे यादेखील सदर ध्वजारोहणास आवर्जून उपस्थित होत्या. शाळेच्या मुख्याध्यापिका सुकेशिनी कोले यांनी सर्वांचे स्वागत केले तर दादासाहेब खरात यांनी सर्व ग्रामस्थ व पालकांचे आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिजाराम काळडोके सरांनी केले.
अधिक वाचा –
– बनावट दाखला तयार करून वडगाव मावळ न्यायालयाची दिशाभूल करणाऱ्या बोगस जामिनदारावर गुन्हा दाखल । Vadgaon Maval
– शिवदुर्ग मित्रच्या शिलेदारांना विद्यार्थीनींनी बांधली राखी । Lonavala News
– शेतीपंपाला मोफत वीज मिळवून देणारी राज्य सरकारची ‘मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना’ – जाणून घ्या सविस्तर