करुंज गावातील राऊतवाडीत येथील कृष्णा शेळके या वीस वर्षीय तरुणाच्या खुनाचा गुन्हा गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिस पथकाने उघडकीस आणून शिताफीने तीन आरोपींना अटक केली आहे. सर्वात आधी धीरज ऊर्फ मोठा बांडी अनिल गरुड (वय 19, संस्कृती अपार्टमेंट, तळेगाव दाभाडे) आणि त्यानंतर त्याचे दोन साथीदार (रा. तळेगाव दाभाडे) अशी एकूण तीन आरोपींना अटक केली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
तळेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगावात रविवारी (दि. 5 नोव्हेंबर) रात्री निलया सोसायटीजवळ कृष्णा कैलास शेळके (राऊतवाडी, करुंज, पवनानगर, मावळ, पुणे) याचा चौघांनी केलेल्या मारहाणीत खून झाला होता. खुनाच्या गुन्ह्याचा समांतर तपास करताना पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल कोळी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपासाची चक्रे फिरवली. तळेगाव स्टेशन परिसरातून बुधवारी (दि. 8 नोव्हेंबर) आरोपी धीरज ऊर्फ मोठा बांडी अनिल गरुड (वय 19, संस्कृती अपार्टमेंट, तळेगाव दाभाडे) आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली. त्यानंतर याबाबतची माहिती पुढे आली. ( 3 accused were arrested in murder of Krishna Shelke yoth from Karunj village )
धीरज बांडी आणि त्याचे तीन साथीदार रविवारी रात्री मुंबई-पुणे महामार्गावरून पायी फिरत होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कृष्णा शेळके आणि त्याच्या दोन मित्रांसोबत त्यांचा किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यावेळी शेळके याने आरोपींपैकी एकाच्या कानाखाली मारली. आरोपी धीरज गरुड आणि त्यांच्या तीन साथीदारांनी चिडून कृष्णा यास लाथाबुक्याने मारहाण करून चाकूने वार केले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. या माहितीवरून पथकाने गुरुवारी (दि. 9 नोव्हेंबर) आफ्तार खान, सिद्धार्थ ऊर्फ सोन्या उत्तम रणदिवे यांना अटक केली. आणखी एका फरारी आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत. आरोपींना वडगाव मावळ न्यायालयाने 16 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी! मावळ तालुका काँग्रेस (आय) उपाध्यक्षपदी राजू फलके यांची नियुक्ती
– छगन भुजबळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची वडगाव मावळ पोलिसांकडे तक्रार
– मावळ तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी भारत काळे बिनविरोध; कार्यकारी संचालकपदी ‘यांची’ निवड