कान्हे गाव रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे रुळाच्या जवळ असणाऱ्या झाडाझुडपात एका 54 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह शुक्रवारी (दिनांक 19 मे) आढळून आल्याने सर्वत्र एकच खळबळ माजली. डोक्यात दगड घालून सदर व्यक्तीचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सकाळी 11 च्या सुमारास उघडकीस आला. ( 54 year old man murdered near Kanhe village railway station case registered in Vadgaon Maval police )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
भागुजी बाबुराव काटकर (वय 54, रा. पारवडी, ता. मावळ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी मृत व्यक्तीचा मुलगा ओमकार भागूजी काटकर (रा. पारवडी, मावळ) याने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात वडगाव मावळ पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, भागूजी काटकर हे कान्हे येथील महिंद्रा कंपनीत कामाला होते. गुरुवारी रात्री ते आपल्या रात्र पाळीच्या ड्युटी साठी कामाला गेले होते. पण रात्री कामावर पोहचले नाही. शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्यापुर्वी त्यांचा मृतदेह कान्हे रेल्वे स्टेशन जवळ असणाऱ्या झाडाझुडुपांमध्ये आढळून आला. डोक्यात मारहाण करत त्यांचा खून करण्यात आला आहे. चेहऱ्यावर डाव्या डोळ्याच्यावर दगडाने गंभीर मारहाण करण्यात आली आहे. तसेच चेहऱ्यावर काळे निळेवळ ऊठलेले आहेत. हा खून कोणी व कशासाठी केला हे अद्याप समजू शकलेले नाही. वडगाव मावळ पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
अधिक वाचा –
– स्वत:ला कट्टर शिवभक्त म्हणवून घेणारे बाबाराजे देशमुख यांना खंडणी प्रकरणात अटक । BabaRaje Deshmukh Arrest
– धक्कादायक! पवनानगर येथील महावितरण कर्मचाऱ्याचा धामणदरा इथे काम करताना विजेच्या धक्क्याने मृत्यू