आज 15 ऑगस्ट 2023 अर्थात भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिन आणि 77 वा स्वातंत्र्यदिन. देशभर स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे. देशातील सर्व सरकारी कार्यालये, शाळा कॉलेजेस, संस्था आदी ठिकाणी ध्वजारोहण करुन तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ इथे स्वातंत्र्य दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. वडगाव मावळ पोलिस दलाकडून तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. यावेळी आमदार सुनिल शेळके हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
राज्य शासनाच्या नियमानुसार वडगाव मावळ तहसील कार्यालय इथे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मावळ विधानसभेचे आमदार सुनील शेळके, प्रांताधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार विक्रम देशमुख, माजी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्रीमती पर्वता शंकर रगडे यांचा स्वातंत्र्यसैनिक कुटुंबीय म्हणून सन्मान करण्यात आला. प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांनी नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. तर आमदार शेळके यांनी भारत देशाचे स्वातंत्र्य चिरायू होवो अशा शुभेच्छा नागरिकांना दिल्या. ( 77th Indian Independence Day celebrations are in full swing at Vadgaon Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– दैनिक मावळ बुलेटीन : ‘पुणे मेट्रोचे स्टिअरिंग मावळ कन्येच्या हाती’ । ‘त्या’ ग्रामपंचायत सदस्यांवरील कारवाईला स्थगिती
– प्रवासासाठी घराबाहेर पडताय? ही बातमी वाचा… द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी!
– साळुंब्रे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नवीन सभासदांना भाग भांडवल प्रमाणपत्र वाटप