‘ राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा ’ 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022 दरम्यान पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने 10 सप्टेंबरपर्यंत प्रलंबित 63 हजार 764 प्रकरणांपैकी 62 हजार 947 सेवांच्या निर्गतीसह चांगली कामगिरी केली असून 21 सप्टेंबर हा दिवस ‘महा सेवा दिन’ म्हणून साजरा करत या एकाच दिवशी 26 हजार 529 सेवा पुरवण्यात आल्या आहेत. ( Rashtraneta to Rahtrapita Service Fortnight )
सेवा पंधरवडा कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसानीबाबतच्या नवीन शासन निर्णयानुसार 23 हजार 260 शेतकऱ्यांना मदत निधीचे वितरण करण्यात आले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) साठी स्वयंनोंदणी केलेल्या 15 हजार पैकी 14 हजार 790 शेतकऱ्यांच्या पात्र-अपात्रतेबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 9 हजार 776 प्रलंबित फेरफार नोंदींचा निपटारा करण्यात आला असून 16 अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रलंबित वन हक्क पट्टे (अपील वगळून) मंजूर करण्यात आली आहेत. ( Pune District Collectorate Office Report )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबत (नॉन क्रिमी लेयर) 1 हजार 6 प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. विवाह नोंदणी प्रमाणपत्रे – 49, मालमत्ता हस्तांतरण नोंद – 476, नव्याने नळ जोडणी – 122, मालमत्ता कराची आकारणी व मागणी पत्र देणे – 6 हजार 700 आणि आपले सरकार/ पीजी पोर्टल तक्रार निवारण पोर्टलवर आलेल्या 3 हजार 981 अर्जांची निर्गती करण्यासोबतच यासह 2 हजार 771 पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले आहे. याशिवाय सेवा पंधरवड्यामध्ये सेतू सुविधा केंद्रांमध्ये प्राप्त 26 हजार 376 अर्जांपैकी 23 हजार 493 अर्जांवर निर्णय घेण्यात आला आहे.
‘पीएम-किसान’ योजनेमध्ये जिल्ह्यातील 4 लाख 90 हजार पात्र लाभार्थी असून युद्धपातळीवर काम करत त्यापैकी 4 लाख 40 हजार लाभार्थ्यांची शेतजमिनविषयक माहिती (लॅण्ड रेकॉर्ड्स) केंद्र शासनाच्या निर्देशानुसार अपलोड केली आहे. उर्वरित लाभार्थ्यांची माहितीही गतीने अपलोड करणे सुरू आहे. योजनेसाठी पात्र असलेल्यांपैकी 3 लाख 95 हजार शेतकऱ्यांची आधारजोडणी करण्यात आली असून उर्वरित कामाला वेग देण्यात आला आहे.
हेही वाचा – Video : मावळमध्ये शिवसैनिकांनी लावलेले होर्डिंग अज्ञातांनी फाडले, अनिकेत घुलेंकडून तीव्र शब्दात निषेध
सेवा पंधरवडा कालावधीमध्ये 21 सप्टेंबर हा दिवस जिल्ह्यात ‘महा सेवा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. या एकाच दिवशी 26 हजार 529 सेवा पुरवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये महसूल विभागाच्या 14 हजार 981 सेवा पुरवण्यात आल्या तर महसूल विभागामार्फत 7 हजार 43 लाभार्थ्यांना नैसर्गिक आपत्ती लाभ वितरण करण्यात आले. पोलीस विभाग, महावितरण, मनपा, नगर प्रशासन, ग्रामपंचायत विभाग, आरोग्य विभाग तसेच शिक्षण विभाग यांच्याकडून एकूण 4 हजार 505 सेवा देण्यात आल्या.
तालुका स्तरावर पुणे-शहर, पिंपरी-चिंचवड, आंबेगाव, बारामती, भोर, हवेली, जुन्नर, खेड, मावळ, शिरुर, वेल्हे तहसीलदार कार्यालयांमार्फत विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आले. लम्पी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेत 70 हजार पशुधनाचे लसीकरण करण्यात आले.
हेही वाचा – सहकार क्षेत्रात अतुलनीय योगदान दिल्याबद्दल बबनराव भेगडे यांना ‘सहकार भूषण’ पुरस्कार
आता प्रत्येक महिन्याला ‘महा सेवा दिन’
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दर महिन्यात घेण्यात येणाऱ्या फेरफार अदालतीमध्येदेखील अशाप्रकारे ‘महा सेवा दिन’ साजरा करण्यात येणार असून सर्व विभागांना महाराजस्व अभियानामार्फत समाविष्ट केले जाणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी कळवले आहे.
( माहिती स्त्रोत – District Information Office Pune / fb )
अधिक वाचा –
सेवा पंधरवडा: लोणावळा शहर पोलिस स्टेशनकडून ‘तक्रार निवारण दिनाचे’ आयोजन, तब्बल ‘इतक्या’ अर्जांचे निवारण
मावळ तहसील कार्यालयाकडून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत ‘महासेवा मेळावा’