टाकवे खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नॅशनल इन्शुरन्स एजन्सी ( NIA ) यांच्या वतीने विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चे वाटप करण्यात आले. तसेच पावसाळ्यात विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांच्या साठी रेनकोट व बूट खरेदीसाठी देणगी देखील देण्यात आली. ( School Bags To Takwe Khurd ZP School Students by National Insurance Agency )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी प्रिन्सिपल संजय माळी सर, संदीप पांडे सर, जयश्री श्रीधर मॅडम आणि शीतल थोरात उपस्थित होते. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ गायकवाड, विश्वास ढमाले, दत्तात्रय गरुड व माता भगिनी देखील उपस्थित होत्या. यापूर्वी देखील एनआयए ने टाकवे खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुलांना जेवणाच्या डब्याचे वाटप केले होते, सोबतच गावात विमा विषयक जनजागृती केली होती.
अधिक वाचा –
– ‘बा विठ्ठला…समाजातील प्रत्येक घटकाला सुखी, समृद्ध कर’, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे; काळे दांपत्य मानाचे वारकरी
– एक रुपयात पीक विमा! योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन, ‘या’ पिकांचा समावेश, जाणून घ्या सविस्तर