वडगांव शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अनंता कुडे यांचा वाढदिवसा निमित्त अनाठायी खर्चाला बगल देत वडगांव शहर भारतीय जनता पक्षाचे वतीने अध्यक्ष अनंता कुडे यांनी वडगांव मावळ येथील प्रभाग क्रमांक 15 येथील ठाकरवस्ती भागातील अंगणवाडी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य संच आणि खाऊ वाटप करण्यात आले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, ज्येष्ठ नेते सोमनाथ काळे, नगरसेवक प्रवीण चव्हाण, नगरसेवक ॲड.विजयराव जाधव यांनी शुभेच्छा व्यक्त करत असताना अध्यक्ष अनंता कुडे यांनी केलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. शाळेच्या सुरुवातीला मिळालेल्या या भेटीमुळे विद्यार्थ्यांनाही आनंद झाला. ( Helped students on birthday of Vadgaon Maval City BJP President Ananta Kude )
या प्रसंगी नगरसेवक रविंद्र म्हाळसकर, वडगांव शहर भाजपा कार्याध्यक्ष नगरसेवक प्रसाद पिंगळे, संघटन मंत्री किरण भिलारे, माजी सरपंच नितीन कुडे, माजी सरपंच संभाजीराव म्हाळसकर, सरचिटणीस कल्पेश भोंडवे, सुनिल कुडे, सागर मराठे, प्रमोद नवघणे, मावळ फेस्टीवलचे संचालक महेंद्र म्हाळसकर, वडगांव शहर भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे, उपाध्यक्ष कुलदीप ढोरे, प्रमोद नवघणे, सोमनाथ पवार, शिक्षक वृंद चेतना ढोरे, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– समृद्धी महामार्गावर अग्नीतांडव! पुण्याला निघालेल्या बसचा बुलढाण्यात भीषण अपघात, 25 जणांचा आगीत होरपळून मृत्यू
– ‘मोदी सरकारचे 9 वर्षातील यश’ निबंध स्पर्धा : हचिंग्ज स्कूलमधील स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे