भीमशक्ती संघटनेकडून मंगळवारी (दिनांक, 1 ऑगस्ट) चंद्रकांत हांडोरे – माजीमंत्री व संस्थापक अध्यक्ष भीमशक्ती यांच्या मार्गदर्शनाखाली, गोपाळराव तंतरपाळे यांच्या मुख्य नेतृत्वात तहसील कार्यालय वडगाव मावळ इथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. परंतू वडगाव मावळ पोलिस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी ठोस आश्वासन दिल्याने पूर्वनियोजित आंदोलन स्थगित करण्यात आले. ( Maval Letter to MLA Sunil Shelke on behalf of Bhimshakti Association )
‘तुमच्या सर्व मागण्या 15 दिवसाच्या आत तहसीलदार साहेबांशी चर्चा करून मार्गी लावण्याचे आश्वासन’ कदम यांनी दिले. त्यानंतर संघटनेच्या वतीने गोपाळराव तंतरपाळे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी आमदार सुनिल शेळके यांची भेट घेतली. तसेच आमदार शेळके यांना संघटनेच्या विविध मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये प्रामुख्याने मावळ तालुक्यातील मागासवर्गीयांच्या शेतजमिनी कुलमुखत्यार पत्राद्वारे रक्कम न देता बळकावणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली गेली.
भीमशक्ती संघटनेच्या शिष्टमंडळामध्ये संतोष चौगुले, अन्वर सय्यद, राजेंद्र यादव, राजेंद्र लोट, दौलत कुरेशी, कृष्णा राजले, ओमकार पाटेकर, गणेश जगताप, लक्ष्मी कांबळे, निकीता गायकवाड इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच समस्त मोर्चेकरी व आंदोलन करते यांचा समावेश होता. ( Maval Letter to MLA Sunil Shelke on behalf of Bhimshakti Association )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– लोणावळा शहरातील नारायणी धाम इथे सुरु असलेल्या श्रीमद भागवत कथा सप्ताहाला राज्यपाल रमेश बैस यांची भेट
– पिंपरी-चिंचवड पोलिसांचा मोक्का पॅटर्न! डोंगरे, परदेशी, मोतीरावे टोळ्यांवर मोक्का, एकूण 24 टोळ्यातील 226 गुन्हेगारांवर कारवाई
– पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार..! 1 ऑगस्ट रोजी पुणे शहरातील वाहतुकीत अनेक बदल, लगेच पाहा