बिरसा ब्रिगेड मावळ यांच्या वतीने शिरदे गावात (ता. मावळ) बुधवारी (दिनांक 9 ऑगस्ट) जागतिक आदिवासी दिन ( World Tribal Day 2023 ) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आदिवासी युवकांनी सकाळी कामशेत ते शिरदे अशी भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते. कार्यक्रम स्थळी ज्ञानेश्वर मोरमारे यांच्या अध्यक्षतेखाली मणिपूरमधील अमानवीय घटनेचा निषेध व्यक्त करुन इर्शाळवाडी येथील नैसर्गिक आपत्तीत व मणिपूर येथील जातीय हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या समाज बंधु-भगिनींना श्रद्धांजली वाहण्यात आली. तदनंतर मान्यवर आदिवासी समाजबांधवांच्या शुभहस्ते आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात केले. ( world tribal day celebrated with enthusiasm at Shiradhe Village by birsa brigade maval )
शिरदे ग्रामस्थांनी जागतिक आदिवासी दिन निमित्ताने उपस्थित सर्व आदिवासी बांधवांचे यथायोग्य स्वागत केले. कार्यक्रमाचे प्राताविक आदिवासी चळवळीचे निष्ठावंत सुरेश चिमटे यांनी केले. याप्रसंगी इयत्त 10 वी व 12 वी तसेच स्पर्धा परीक्षेतील यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. शिरदे गावात ग्रामस्वच्छता राखणारे वयोवृद्ध गेणू बगाड यांना यावेळी समाजभूषण सन्मानाने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी समाजातील सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकारी यांचा देखील सत्कार करण्यात आला.
प्रमुख व्याख्याते शरद वाजे सर, प्रा. मधवे सर, प्रा. भांगे आदिवासी संस्कृती, चालीरीती, रुढी परंपरा यांबाबत मार्गदर्शन केले. आदिवासी चळवळ आणि समाजापुढील आव्हाने यावर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरमारे यांनी आपले विचार मांडले. तसेच शिरदे ग्रामस्थांनी सर्व उपस्थित आदिवासी बंधु-भगिनींचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात आदिवासी बंधु-भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाजीराव सुपे आणि अंकुश मोरमारे यांनी केले. ( world tribal day celebrated with enthusiasm at Shiradhe Village by birsa brigade maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मणिपूर हिंसाचार आणि महिलांवरील अत्याचाराचा मावळ बिरसा ब्रिगेड संघटनेकडून तीव्र निषेध
– ‘स्पंदन’ आणि ‘खुशी के रंग’ फाउंडेशनकडून कोथूर्णे इथे आदिवासी समाजातील 50 विद्यार्थ्यांना मोफत स्कूल कीटचे वाटप
– मावळ तालुक्यात उभे राहणार क्रीडा संकुल! आमदार सुनिल शेळके यांनी घेतली मंत्री संजय बनसोडे यांची भेट