जळगावमधील पाचोरा तालुक्यातील आमदार किशोर पाटील यांची अलीकडेच पत्रकार संदीप महाजन यांना शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. त्यात आमदाराने पत्रकाराला मारहाण करण्याची धमकी दिली होती. याबाबत कुठलीही कारवाई न झाल्याने आता दिलेल्या धमकीप्रमाणे पत्रकाराला भररस्त्यात मारहाण करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्था राहिलीय का असा प्रश्न विरोधक करत आहेत. पाचोऱ्यातील पत्रकार संदीप महाजन यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी ट्विट केला आहे. ( Journalist Sandeep Mahajan beaten up in pachora Video Viral Jalgaon Crime News )
जळगावातील बालिका हत्याकांड प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केल्याप्रकरणी पत्रकार संदीप महाजन यांना अज्ञातांनी मारहाण केल्याची घटना जळगावमध्ये घडली आहे. मात्र आमदार किशोर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप पत्रकार महाजन यांनी केला आहे. दरम्यान, आपल्यावर किशोर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी कितीही हल्ले झाले तरी आपण आपला लढा सुरुच ठेवणार असल्याचं संदीप महाजन यांनी म्हटलं आहे. मारहाणीत महाजन किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी महाजन यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ( Journalist Sandeep Mahajan beaten up in pachora Video Viral Jalgaon Crime News )
पत्रकाराला फोनवर आई- बहिणी वरून शिवीगाळ करायची,मारण्याची धमकी द्यायची,दुसऱ्या दिवशी त्या पत्रकाराला गुंड पाठवून मारहाण करायची ..का ? तर त्याने विरोधात बातमी छापली म्हणून….
विशेष म्हणजे ज्या चौकात मारहाण झाली त्या चौकाला या पत्रकाराच्या स्वातंत्र्यसैनिक वडिलांचे नाव दिलेले… pic.twitter.com/cjMxWbT1y3
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 10, 2023
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मणिपूर हिंसाचार आणि महिलांवरील अत्याचाराचा मावळ बिरसा ब्रिगेड संघटनेकडून तीव्र निषेध
– ‘स्पंदन’ आणि ‘खुशी के रंग’ फाउंडेशनकडून कोथूर्णे इथे आदिवासी समाजातील 50 विद्यार्थ्यांना मोफत स्कूल कीटचे वाटप
– मावळ तालुक्यात उभे राहणार क्रीडा संकुल! आमदार सुनिल शेळके यांनी घेतली मंत्री संजय बनसोडे यांची भेट