लोणावळा शहरात ( Lonavla City ) किरकोळ कारणातून एका सफाई कर्मचारी महिलेला मारहाण करण्यात आल्याची घटना घडलीये. लोणावळा शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या प्रकाराबद्दल फिर्यादी अलका राजु साबळे (वय 38 वर्षे, व्यवसाय – सफाई कामगार, लोणावळा रेल्वे स्टेशन, रा. करंजगाव – कामशेत) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी सचिन एकनाथ पवार (वय 31 वर्षे, धंदा – मजुरी, रा. आपटी, ता. भोर जि. पुणे) याच्यावर भारतीय दंड विधान कायदा कलम 326, 504* अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Lonavala city Beating up cleaning lady Case Filed )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 12 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास लोणावळा गावच्या हद्दीतील मार्केट बाजूच्या रेल्वे स्टेशनच्या तिकीट घराशेजारील ब्रीजवर हा प्रकार घडला. फिर्यादी महिलेने रेल्वे ब्रीजवर साफसफाई करत असताना काहीवेळा अगोदर रेल्वे पार्कींगमध्ये कचरा टाकल्यावरून सचिन पवार याला हटकले. त्यातून आरोपी सचिन एकनाथ पवार (35 वर्षे) याने रागाने त्याच्या जवळील पिशवीमध्ये लोखंडी कोयता ठेवून फिर्यादीला मारहाण केली.
हेही वाचा – लोणावळा शहर लई भारी..! इंडियन स्वच्छता लीगमध्ये लोणावळा नगर परिषद ‘अव्वल’
यात फिर्यादीच्या डाव्या खांद्यावर आणि डाव्या डोळ्याच्या खाली नाकावर फ्रॅक्चर झाले, असे फिर्यादीत नमूद आहे. फिर्यादी महिलेच्या या तक्रारीवरुन सदर आरोपी सचिन साबळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एक लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पोवार साहेब हे करत आहेत.
अधिक वाचा –
मावळचे खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत मंत्री गुलाबराव पाटलांनी घेतला मतदारसंघातील पाणी पुरवठा योजनांचा आढावा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाराष्ट्र वाहतूक सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी महेश केदारी यांची नियुक्ती