मावळ तालुक्यातील सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक ( Assistant Registrar ) विठ्ठल सूर्यवंशी ( Vitthal Suryavanshi ) यांना निलंबित ( Suspension ) करण्यात आल्याचे आदेश काढण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टी पक्षासह इतर अनेक पक्ष, नेते पदाधिकारी यांनी सातत्याने विठ्ठल सूर्यवंशी यांच्या बदलीची आणि निलंबनाची मागणी केली होती. यासह या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीने मोठे आंदोलन देखील उभारले होते, अखेर या प्रयत्नांना यश मिळाले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या अंतर्गत बाबींशी काहीही संबंध नसताना कुलगुरूंच्या कामकाजात आणि त्यांच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप करणे तसेच विविध विकास सोसायट्यांमध्ये अनियमित आणि जाणीवपूर्वक कामकाज केल्याच्या ठपका विठ्ठल सुर्यवंशी यांच्यावर ठेवण्यात आला. राज्य शासनाच्या कक्ष अधिकारी पल्लवी कोळेकर यांनी राज्यपालांच्या आदेशानुसार सूर्यवंशी यांच्या निलंबनाचा आदेश जारी केला आहे. ( Suspension of Co-operative Societies Assistant Registrar Vitthal Suryavanshi Maval Taluka )
‘सूर्यवंशी यांनी एकविरा गृहनिर्माण सोसायटी तळेगाव दाभाडे, पवना कृषक संस्था, काले कॉलनी व मावळ तालुक्यातील विविध विकास सोसायट्यांबाबत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 मधील तरतूदीनुसार कार्यवाही केलेली नाही. तसेच या संस्थांवर आपल्या अधिकाराचा गैरवापर करून अनियमित व जाणीवपूर्वक कामकाज केल्याचे निदर्शनास येत आहे. सूर्यवंशी यांनी सहकार आयुक्त कार्यालयाच्या 7 जानेवारी 2005 च्या परिपत्रकानुसार दिलेल्या सूचना विचारात न घेता अवसायकाचा त्रैमासिक अहवाल न घेता अवसायकाला जास्तीचे मानधन मंजूर केले आहे. तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांना सुर्यवंशी यांनी 10 ऑगस्ट २०२२ ला अशासकीय भाषेत पत्र लिहून गैरवर्तन केले आहे. त्यांच्या कामकाज व अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप केलेला असून ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे.’ असे निलंबन आदेशात म्हटले आहे. ( Suspension of Assistant Registrar Vitthal Suryavanshi )
अधिक वाचा –
पॉलिहाऊस उभारणीची मर्यादा किमान 5 एकर करावी, मावळमधील शेतकऱ्यांची केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे मागणी
Video : निसर्ग सौंदर्याचा अद्भूत नजारा, घोराडेश्वर डोंगरावर पसरलीये फुलांची भगवी चादर