पवनानगर : नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक चिटणीस गुरुवर्य कै. अण्णासाहेब विजापूरकर स्मृती प्रित्यर्थ आयोजित तालुकास्तरीय बौद्धिक स्पर्धा नुकतीच तळेगाव दाभाडे येथील ॲड पु. वा. परांजपे विद्यालयात संपन्न झाली होती. या स्पर्धेत पवना शिक्षण संकुलातील प्राथमिक विभाग, माध्यमिक विभाग व कॉलेज विभाग मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करुन तालुक्यात सर्वाधिक 9 बक्षिसे मिळविण्याचा मान मिळवून ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेही मागे नसतात हे दाखवून दिले. ( Students of pavana shikshan sankul pavananagar vidyalaya got great success in taluka level intellectual competition )
स्पर्धानुसार निकाल खालीलप्रमाणे;
पद्य पाठांतर स्पर्धा – ११ वी ते १२ वी गट
१) प्रथम – कु.श्रेया नवनाथ घरदाळे
२) व्दितीय – कु. भालेराव प्रतिक्षा नवनाथ
वक्तृत्व स्पर्धा
३) द्वितीय – कु.सुजाता शंकर पवार
निंबध स्पर्धा – ५ वी ते ७ वी गट
४) द्वितीय- कु.पडवळ सानवी मास्तर
५) द्वितीय- कु.सुतार गौरी तुकाराम
पद्य पाठांतर स्पर्धा– ८ वी ते १० वी गट
६) द्वितीय – कु.ठाकर कावेरी नाथा
पद्य पाठांतर स्पर्धा– ५ वी ते ७ वी गट
७) तृतीय – कु. जाधव स्वराली संतोष
वक्तृत्व स्पर्धा – ५ वी ते ७ वी गट
८) तृतीय- सुतार रुद्र संतोष
पद्य पाठांतर स्पर्धा – १ वी ते ४ थी गट
(पवना प्राथमिक विद्या मंदिर)
९) उत्तेजनार्थ – कु. ठाकर शिवांजली संतोष
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख सुनिल बोरूडे सर, रोशनी मराडे, सुवर्णा काळडोके, वैशाली वराडे, अमोल जाधव, संजय हुलावळे, ज्योती कोंडभर,चैताली ठाकर, पल्लवी दुश्मन, पोखरकर मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षकांचे अभिनंदन पवना शिक्षण संकुलाचे शालेय समितीचे अध्यक्ष आणि नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष खांडगे, नू.म.वि. प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, राजेश म्हस्के, गोपाळे गुरुजी, महेशभाई शहा यांच्या सह सर्व संस्था पदाधिकारी यांनी केले. ( Students of pavana shikshan sankul pavananagar vidyalaya got great success in taluka level intellectual competition )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– पुण्यात नव्हे पिंपरी-चिंचवडमध्येच ‘सायन्स सिटी’ उभारा; खासदार श्रीरंग बारणे यांची राज्य शासनाकडे आग्रही मागणी
– वडगाव मावळमध्ये शनिवारपासून राज्यस्तरीय बेंचप्रेस स्पर्धा, पाहा संपूर्ण वेळापत्रक
– रिक्षा चालकाने अचानक टर्न मारल्याने अपघात, मावळमधील दुचाकीस्वाराचा मृत्यू, चाकण-शिक्रापूर रोडवरील घटना