व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील मनसेची प्रसिद्ध दहीहंडी फोडण्याचा मान घाटकोपरच्या राजे ग्रुपला; जिंकले 6 लाख 66 हजारांचे बक्षीस । Vadgaon Maval

मावळ गर्जना प्रतिष्ठान वडगाव मावळचे वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी गुरुवार दिनांक ७ सप्टेंबर २०२३ रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 9, 2023
in ग्रामीण, लोकल, शहर
Dahihandi-2023

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ गर्जना प्रतिष्ठान वडगाव मावळचे वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी गुरुवार दिनांक ७ सप्टेंबर २०२३ रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वडगाव चे ग्रामदैवत श्री पोटोबा देवस्थान प्रांगणात भव्य प्रांगणात आकर्षक रक्कम रुपये ६,६६,६६६/- व भव्य चषक बक्षिसासह या दहीहंडी , स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होत. या स्पर्धेत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल, लोणावळा येथील तब्बल १७ गोविंद पथकांनी नियोजनबद्ध, हर्षोल्हासात, जोशपूर्ण वातावरणात सहा /सात थरांचे मनोरे रचून दहीहंडी आणि उपस्थित प्रेक्षकांना सलामी देण्यात आली. वडगाव तसेच मावळ तालुक्यातील हजारो नागरिक हा भव्य दिव्य नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते.

Novel NIBR Ads

यावर्षीची दहीहंडी फोडण्याचा मान राजे ग्रुप घाटकोपर – मुंबई यांनी पटकावला. प्रशासनाच्या सूचनेनुसार रात्री १०:०० वा. दहीहंडी फोडण्यात आली आणि एकच जल्लोष झाला जय भवानी, जय शिवाजी, गोविंदा रे गोपाळा बोल बजरंग बली की जय च्या जयघोषात आसमंत निनादला. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते दहीहंडीचे व श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन करून प्रत्यक्ष दहीहंडी स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. या वेळी हंडीचे पूजन मयुर ढोरे माजी नगराध्यक्ष,रुपेश म्हाळसकर अध्यक्ष मनसे मावळ तालुका, सायलीताई म्हाळसकर माजी उपनगराध्यक्ष, सोपानराव म्हाळसकर मुख्य विश्वस्त पोटोबा देवस्थान, अवीकेंदू गुप्ता व्यवस्थापकीय संचालक वेट अँड जॉय आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ( Maval Garjana Pratishthan Dahihandi 2023 Vadgaon City MNS Rupesh Mhalaskar )

त्याचप्रमाणे या दहीहंडी सोहळ्यास शुभेच्छा व भेट देण्यासाठी श्रीरंग बारणे खासदार मावळ लोकसभा, सुनील शेळके आमदार मावळ विधानसभा, सचिन चिखले शहराध्यक्ष/गटनेते/समन्वयक मनसे पिंपरी चिंचवड, राजेंद्र म्हाळसकर संस्थापक अध्यक्ष भैरवनाथ शिक्षण संस्था, प्रभाकर ओव्हाळ जेष्ठ साहित्यिक, अरुण वाघमारे सचिव ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सायली बोत्रे अध्यक्षा भाजपा युवती महिला मावळ, रविंद्र भेगडे अध्यक्ष भाजपा मावळ, अंजली बवरे – मा ग्रामपंचायत सदस्या, पंढरीनाथ ढोरे मा. संचालक खरेदी विक्री संघ मावळ, अरुण चव्हाण, किरण भिलारे, अनंता कुडे, तुकाराम ढोरे, चंद्रकांत ढोरे,सुभाष जाधव आदी विश्वस्त पोटोबा देवस्थान, विजय सुराणा, गणेश विनोदे, बाळासाहेब वाघमारे, सुदेश गिरमे आधी पत्रकार;

तसेच नगरसेवक – वडगांव न. पं., वडगाव नगरपंचायतीचे माजी नगरसेवक चंद्रजीत वाघमारे, राहुल ढोरे, दिनेश ढोरे, राजेंद्र कुडे, किरण म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, मंगेश खैरे, रवींद्र म्हाळसकर, पूजा वहिले, अर्चना म्हाळसकर, सुनिता भिलारे, दिपाली मोरे, कुमार कदम साहेब पो.नि. वडगांव पो. स्टेशन, सुनिल शिंदे उद्योजक, मावळ मनसेचे पदाधिकारी – सुरेश जाधव, अनंता तिकोणे, साहेबराव तेलगु, सूरज भेगडे, शोभा कळसकर, संगिता गुजर, अर्चना ढोरे, राजू भानुसघरे, रुपेश जाधव, गणेश भांगरेउपस्थित होते. यावेळी उपस्थित गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व वाहतूक व्यवस्थेचे नियमन करण्यासाठी वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या वतीने विशेष सहकार्य करण्यात आले.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी रुपेश म्हाळसकर व सायलीताई म्हाळसकर यांनी विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन तानाजी तोडकर, कु‌ ओंकार भांगरे यांनी केले, तर विकास साबळे, दिनेश म्हाळसकर, महेंद्र शिंदे, संग्राम भानुसघरे, अजिंक्य शिंदे, शुभम म्हाळसकर, अनिल नायर, संतोष म्हाळसकर, नवनाथ शिवेकर, आकाश वारींगे,विक्रम कदम, जयंत कुंभार, गणेश मालपोटे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन पार पडले. सागर शेलार,अरुण म्हाळसकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Novel NIBR Ads

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर हल्लाबोल! राजकारणात अस्पृश्यता पाळत असल्याची टीका
– शिवनेरी प्रतिष्ठान गोविंदा पथकानं फोडली वडगाव शहरातील मानाची दहीहंडी; 1 लाख 51 हजारांचं मिळालं बक्षीस
– मोठी बातमी! मावळात पावसाचा जोर वाढला, पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, पाहा तालुक्यात कुठे किती पाऊस झालाय


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव शहरात गोकुळाष्टमी निमित्त आयोजित अखंड हरिनाम साप्ताहची उत्साहात सांगता

Next Post

दैनिक मावळ विशेष – सरपंच असावा तर असा! ओझर्डे गावच्या सरपंचाने राज्यात गाजवलं तालुक्याचं नाव

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Balasaheb-Parkhi-Maval

दैनिक मावळ विशेष - सरपंच असावा तर असा! ओझर्डे गावच्या सरपंचाने राज्यात गाजवलं तालुक्याचं नाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग विस्तारीकरण आणि उन्नत मार्गाच्या कामाला मिळाली गती

June 20, 2026
मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

June 20, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

बुलेट ट्रेनने मुंबई-पुणे ४८ मिनिटांत; महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचे केंद्र बनवणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 19, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.