व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, July 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिवजन्मभूमीचा डंका जगभरात वाजणार! शिवछत्रपतींचा जगातील सर्वात मोठा पुतळा जुन्नरमध्ये उभारला जाणार

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याचा संकल्प शिवजन्मभूमी जुन्नरचे माजी आमदार आणि शिवसेना जिल्हाप्रमुख शरद सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत घोषित केला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 12, 2023
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे
Chhatrapati-Shivaji-Maharaj

File Image - Chhatrapati Shivaji Maharaj


महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याचा संकल्प शिवजन्मभूमी जुन्नरचे माजी आमदार आणि शिवसेना जिल्हाप्रमुख शरद सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत घोषित केला आहे. गुजरातमध्ये उभारण्यात आलेला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी पुतळ्याच्या धर्तीवर शिवरायांचा पुतळा देखील भव्यदिव्य उभारला जाईल. या पुतळ्याची नोंद संपूर्ण जगाला घ्यावी लागणार असून त्यांच्या निर्मितीसाठी शिल्पकार देखील निश्चित करण्यात आले असल्याचे सोनवणे यांनी सांगितलं आहे.

सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भीमाशंकर येथे दर्शनासाठी आले असता त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आज नागरिकांपर्यंत आपला संकल्प पोहचवण्यासाठी पुतळा उभारणीची माहिती माध्यमांसमोर देत असल्याचे शरद सोनवणे यावेळी म्हणाले. येत्या चार दिवसांत मुख्यमंत्र्यांनी भेटण्यासाठी वेळ दिली असून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली जाईल. 29 सप्टेंबर रोजी आणखीन तीन महत्वाच्या घोषणा आणि पुतळा उभारणी कामाचा सविस्तर आराखडा मांडण्यात येईल. 29 सप्टेंबर 2023 ते 29 सप्टेंबर 2024 या एक वर्षाच्या दरम्यान शिवरायांच्या पुतळ्याची उभारणी पूर्ण करण्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, शरद सोनवणे यांच्याकडून गेल्या पंधरा दिवसांपासून सोशल मीडिया तसेच फ्लेक्सच्या माध्यमातून सर्वात मोठी घोषणा केली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. आज घोषणेचा एक भाग समोर आणत छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये उभारण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. ही घोषणा करतानाच आपल्या संकल्पात शिवरायांचा पुतळा हा एक महत्वाचा भाग असून आणखीन तीन मोठ्या घोषणा 29 सप्टेंबरलाच होणार असल्याचं सोनवणे यांनी सांगितले आहे. ( worlds largest statue of Chhatrapati Shivaji Maharaj is going to be erected in Junnar taluka Pune )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– लोणावळ्यात हजारो नागरिकांनी एकाचवेळी घेतली नशा मुक्तीची शपथ! IPS सत्यसाई कार्तिक आणि शहर पोलिसांचा उपक्रम
– विरोध कालही..आजही आणि उद्याही! पवना बंदिस्त जलवाहिनीवरील स्थगिती उठवल्यानंतर रविंद्र भेगडेंनी स्पष्ट केली भुमिका
– पवना जलवाहिनी प्रकल्पाची स्थगिती उठवली! सरकारने हा निर्णय का घेतला? पत्रात नेमकं काय लिहिलंय? वाचा सविस्तर


dainik maval jahirat

Previous Post

कुरुळी गावातील महिलांना विविध प्रकारचे मसाले बनवण्याचे प्रशिक्षण; हॅन्ड इन हॅन्ड इंडिया संस्थेचा उपक्रम

Next Post

कामशेत – वडगाव पोलिस स्टेशनचे अधिकारी आणि सार्वजनिक गणेश मंडळे, पोलिस पाटील यांच्यात नियोजन बैठक संपन्न

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
ganesh-mandals-planning-meeting

कामशेत - वडगाव पोलिस स्टेशनचे अधिकारी आणि सार्वजनिक गणेश मंडळे, पोलिस पाटील यांच्यात नियोजन बैठक संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.