व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, May 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वनविभागाकडून मौजे बोरवली गावात वनराई बंधाऱ्याची निर्मिती; वनराई बंधारा म्हणजे काय? समजून घ्या

शिरोता वनपरिक्षेत्र (मावळ) पुणे वनविभाग मार्फत मौजे बोरवली येथे श्रमदानातुन वनराई बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 17, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
vanrai-dam

Photo Courtesy : Team Dainik Maval


शिरोता वनपरिक्षेत्र (मावळ) पुणे वनविभाग मार्फत मौजे बोरवली येथे श्रमदानातुन वनराई बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली. शिरोता वनपरिक्षेत्र मधील अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतः श्रमदान करून हा बंधारा पुर्णत्वास नेला. या वनराई बंधाऱ्यामुळे भूजल पातळीत वाढ होण्यास लाभ होणार आहे. ( vanrai dam constructed in Borvali village through shirota forest zone maval )

वनराई बंधारा म्हणजे काय?

नाला किंवा ओढा यातील पाणी यांना स्थानिक रित्या मिळणाऱ्या वस्तूंनी अडवून तात्पुरत्या स्वरूपात पाण्याची तजवीज छोट्या प्रमाणात करता येते. याचे बांधकाम सिमेंटची रिकामी पोती, माती ,वाळु,दगड यांच्या सहाय्याने करता येते. याला मोठ्या प्रमाणावर खर्च येत नाही. हा बंधारा वनराई संवर्धनाचे काम करतो म्हणून यास वनराई बंधारा म्हटले जाते.

वनराई बंधारा पक्षी, जनावरे व जंगली प्राणी यांची तहान भागविण्यासाठी लाख मोलाची मदत करणार आहे. गावकऱ्यांनीही वनराई बंधाऱ्यावर अधिक भर देत पाणी अडवून, पाणी जिरविण्याचे आवाहन वन खात्याकडून करण्यात आले. या वनराई बंधाऱ्यांमुळे पावसाचे पाणी साठविले जाऊन परिसरातील भुजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

ह्यावेळी सुशील मंतावार वनपरिक्षेत्र अधिकारी – शिरोता, वहाणगाव वनपरिमंडळाचे वनपाल सखाराम बुचडे, वनरक्षक लालासाहेब वाघखपुरे, नवनाथ मिलखे, काजल पाटील, जयश्री गोंदवले तसेच वनकर्मचारी आणि गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्याचे मावळ परिसर तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेकडून कौतुक करण्यात आले आहे. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांनी ही माहिती दिली.

“चालू वर्षी “एल निनो” च्या हवामान परिणामामुळे महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे. त्याअनुषंगाने भुजल पातळीत वाढ होण्यास वनराई बंधारे पाणी अडविण्याचे व पाणी जमिनीत जिरवण्याचे लाख मोलाचे काम करण्याबरोबर निसर्गचक्रातील महत्त्वाची भूमिका बजावत असते. पाण्याचे महत्त्व हे कोणत्याच परिमाणात मोजता येत नाही. त्याचा उपयोग आणि महत्त्व प्रत्येकाने जाणले पाहिजे. पाणी अडविले तर भूजल पातळीत वाढ होईल व मोठ्या प्रमाणात उन्हाळ्यातही पाणीटंचाईवर मात करणे शक्य होईल.” सुशील मंतावार – वनपरिक्षेत्र अधिकारी शिरोता

“नागरिकांनीही वन विभागाने केलेल्या या कामाचा आदर्श घेऊन आपापल्या जवळपास असलेल्या ठिकाणी, जिथे असे काम करता येईल अशा ठिकाणी वनराई बंधारे संबधित अधिकारी यांची परवानगी घेऊन करावेत” – निलेश गराडे (संस्थापक वन्यजीव रक्षक मावळ संस्था) ( vanrai dam constructed in Borvali village through shirota forest zone maval )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– गणेश भक्तांना टोल माफी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय
– तळेगाव नगरपरिषद आणि महिंद्रा कंपनीच्या संयुक्त विद्यमाने स्टेशन भागात देशी प्रजातीच्या 105 वृक्षांची लागवड
– मोठी बातमी! धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी मीडियम शाळांमध्ये असलेली प्रवेशसंख्या वाढवण्याचा निर्णय


Previous Post

भाजे येथील संपर्क बालग्राममधील विद्यार्थिनींना करिअर विषयक मार्गदर्शन; इनर व्हील क्लबचा उपक्रम

Next Post

शिंदे सरकारचे एकापेक्षा एक जबरदस्त निर्णय! फक्त मराठवाडा नाही तर अवघ्या महाराष्ट्रासाठी अनेक मोठे निर्णय, वाचा सविस्तर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
CM-Eknath-Shinde

शिंदे सरकारचे एकापेक्षा एक जबरदस्त निर्णय! फक्त मराठवाडा नाही तर अवघ्या महाराष्ट्रासाठी अनेक मोठे निर्णय, वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Potters will be able to lift clay for 9 months no penalty above 700 brass limit Big decision of Revenue Minister

कुंभार कारागिरांना 9 महिने उचलता येणार माती, 700 ब्रासच्या मर्यादेवर कोणताही दंड नाही ; वीटभट्टीसाठी ५ वर्षांसाठी सलग परवानगी मिळणार

May 13, 2026
Livestock farmers take care of your livestock measures if symptoms of heatstroke in livestock

पशुपालकांनो.. पशुधनाची काळजी घ्या, पशुधनामध्ये उष्माघाताची लक्षणे दिसल्यास ‘या’ उपाययोजना करा

May 13, 2026
Crime

पाहुणा म्हणून आला आणि घर लुटून गेला, तळेगावमधील धक्कादायक प्रकार

May 13, 2026
Sanskar Foundation provides support to tribal from Sai Village whose house was burnt down in fire

वणव्यात घर जळून खाक झालेल्या साई येथील आदिवासी बांधवाला ‘संस्कार’चा आधार

May 13, 2026
Bhumi Pujan of development works at Joshiwadi Thakarvasti in station area of ​​Talegaon Dabhade

तळेगाव शहरातील स्टेशन परिसरातील जोशीवाडी, ठाकरवस्ती येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन

May 12, 2026
maharashtra Govt decision Big relief for farmers stamp duty waiver for crop loans up to Rs 2 lakh

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सभासद शेतकऱ्यांना ३ हजार १५४ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप

May 12, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.