व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, August 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दिवसभर कडक उपवास आणि रानभाज्यांचा नैवद्य ; पवन मावळातील गावशिवारांत ऋषीपंचमीची खास परंपरा, नक्की वाचा

भाद्रपद महिन्याच्या तृतीयेला होणारे हरितालिका पूजन आणि गणेश चतुर्थीनंतर भाद्रपद पंचमी दिवशी येणारा ऋषी पंचमी हाही दिवस तितकाच महत्वाचा आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 28, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
Rishi-Panchami

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : भाद्रपद महिना मुख्यत्वे ओळखला जातो तो गणेशोत्सवासाठी. परंतू भाद्रपद महिन्याच्या तृतीयेला होणारे हरितालिका पूजन आणि गणेश चतुर्थीनंतर भाद्रपद पंचमी दिवशी येणारा ऋषी पंचमी हाही दिवस तितकाच महत्वाचा आहे. श्रावणातील व्रत-वैकल्यांप्रमाणे ऋषिपंचमीचे व्रतही स्त्रिया भक्तीभावे करतात.

भारतीय इतिहासात होऊन गेलेल्या दिग्गज ऋषींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. त्याचप्रमाणे प्रदेशानुसार ह्या दिवसाला अनेक प्रथा परंपराही जोडल्या गेल्या आहेत. मावळ तालुक्यातील पवन मावळ भागात पारंपारिक पद्धतीने महिला वर्ग ऋषी पंचमी साजरी करतात. पवन मावळातील मौजे शिळींब गावात दैनिक मावळ टीमने स्थानिक महिलांशी संवाद साधत ह्या दिनाचे महत्व आणि येथील परंपरा समजून घेतली. ( Rishi Panchami Know About Puja Vidhi And Significance In Marathi )

ऋषी पंचमीचे महत्व :
भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषींची मनोभावे पूजा करतात. त्यामुळे या दिवसाला ऋषिपंचमी हे नाव मिळाल्याचे समजते. कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि अत्रि या सात ऋषींची प्रत्येकी एक आणि वसिष्ठांची पत्नी अरुंधतीची एक अशा एकूण 8 सुपाऱ्या मांडून ही पूजा केली जाते. या दिवशी बैलांच्या कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही. वर्षातून किमान एक दिवस तरी स्वतः कष्ट करून मिळवलेले अन्न खावे, असे यामागील मुख्य उद्दिष्ट्य असल्याचे सांगितले जाते.

पवन मावळ भागात ऋषीपंचमीची वेगळी परंपरा :
शिळींब गावात अनेक वर्षांपासून महिला वर्ग एकत्रित येऊन ऋषीपंचमी साजरी करतात. दिवसभर कडक व्रत अर्थात उपवास करुन सर्व महिला एकत्र येतात. प्रत्येक घरातील महिला एका ठिकाणी गोळा होतात. जवळ मंदिर अथवा देव्हाऱ्यात ऋषीची पुजा मांडली जाते. त्यानंतर सर्व महिला मनोभावे ऋषीची पुजा करतात. ऋषीची पुजा करण्यापुर्वीच सर्व महिला मिळून गावाजवळ उपलब्ध असणाऱ्या रानभाज्या गोळा करतात. त्या रानभाज्या शिजवल्या जातात. जोडीला वरईची भाकरी आणि भात असतो. ऋषीची पुजा झाल्यानंतर सर्व महिला बंद खोलीत गोळा होऊन दिवसभर पाळलेला कडक उपवास त्याच रानभाज्या खाऊन सोडतात.

ऋषी हे रानावनात राहणारे, त्यामुळे रानात जे पिकतं तेच खाण्याची ही परंपरा आहे. तसेच काहीवेळा ऋषींप्रमाणे कठोर म्हणून हे व्रत दिवसभर कडक उपवास करुन पुर्ण केले जाते. त्याच्या जोडीला उपवास सोडताना कुणाही पुरुषाचे अथवा प्राण्याचे मुख न पाहण्याचीही परंपरा या भागात आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मराठा आरक्षण मोर्चा : पुणे जिल्ह्यातील वाहतूक मार्गात बदलाबाबत आदेश जारी – जाणून घ्या । Pune News
– मोठा निर्णय ! एसईबीसी व ओबीसी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ
– मराठ्यांचं वादळ मुंबईच्या दिशेने रवाना, मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर गर्दी होण्यास सुरूवात, वाहतूक मार्गात मोठा बदल – वाचा अधिक
– चांगला पाऊस आणि पोषक वातावरणामुळे मावळातील भात पिके तरारली, शेतकरी आनंदीत । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

मराठा आरक्षण मोर्चा : पुणे जिल्ह्यातील वाहतूक मार्गात बदलाबाबत आदेश जारी – जाणून घ्या । Pune News

Next Post

देहूरोड छावणी परिषदेत नागरिकांच्या तक्रारींवर आढावा बैठक ; आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासनाला ठोस निर्देश

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
देहूरोड छावणी परिषदेत नागरिकांच्या तक्रारींवर आढावा बैठक ; आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासनाला ठोस निर्देश

देहूरोड छावणी परिषदेत नागरिकांच्या तक्रारींवर आढावा बैठक ; आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासनाला ठोस निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
MLA Sunil Shelke urgent meeting held to resolve issue regarding Gevhande crematorium

आमदार सुनील शेळके यांनी पाळला शब्द ; गेव्हंडे स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक

August 4, 2026
Marathi Journalist Sangh Maval Taluka New Executive Committee announced

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

August 4, 2026
MLA Sunil Shelke efforts land transferred to talegaon nagarparishad for Andhra Dam water project

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश ; आंध्रा धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

August 4, 2026
ISO Rating of Zilla Parishad Schools in Mundhavare Valak Wadiwale village in maval taluka

मुंढावरे, वळक, वाडीवळे येथील जिल्हा परिषद शाळांना आयएसओ मानांकन

August 4, 2026
Cyber ​​security and anti-drug awareness campaign by Vadgaon Maval Police

Vadgaon Maval : वडगाव मावळ पोलिसांकडून सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थविरोधी जनजागृती

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.