गिर्यारोहकांच्या साहसाला आव्हान देणारा महाराष्ट्रातील सर्वात अवघड असलेला तीनशे फूट उंचीच्या वजीर सुळक्यावरून मावळचे आमदार सुनिल शेळके यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. बुद्धिबळाच्या पटावर जसा वजीर असतो तसा हा सुळका दिमाखात उभा आहे. हा उंच सुळका सर करण्याचे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पॉईंट ब्रेक ॲडवेंचर ग्रुपच्या मार्गदर्शनाखाली नऊ वर्ष वयाच्या कु. साई नारायण मालपोटे, आठ वर्ष वयाची कु. ध्रुवी गणेश पडवळ आणि विशाल गोपाळे यांनी वजीर सुळका सर करुन अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या मोहिमेत नारायण मालपोटे, नितीन पिंगळे, प्रकाश वरघडे, अजित गोपाळे, पांडुरंग जाचक, बनी शिंदे, राजश्री चौधरी, समीर भिसे, विवेक सूर्यवंशी, शुभम अहिरे, अक्षय ठाकरे, रोहित पगारे, तेजस जाधव यांनी सहभाग घेऊन मोहीम यशस्वीपणे पार पाडली.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर विभागात माहूली किल्ला आहे. याच परिसरात असलेल्या तीनशे फूट उंचीच्या वजीर सुळका गिर्यारोहणासाठी अतिकठीण श्रेणीत गणला जातो. त्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी वांद्रे गावातून तीन तासाची दमछाक करणारी पायपीट करावी लागते. दुर्गम परिसर, उंच टेकड्या, घनदाट जंगल आणि पाठीवर ओझे असा प्रवास करून त्यानंतर वजीर सुळक्याची अडीचशे फुटांची नव्वद अंशातील सरळ उभी अतिकठीण चढाई करावी लागते.
शारीरिक आणि मानसिकतेचा कस पाहणारी मोहीम म्हणून वजीर मोहिमेकडे पाहिले जाते. परंतु हा अवघड वजीर सुळका सर करुन आमदार सुनिल शेळके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचे ध्येय उराशी बाळगून जिद्द, चिकाटी आणि साहसाच्या जोरावर या धडाकेबाज गिर्यारोहकांनी आमदार शेळके यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. ( Happy birthday to MLA Sunil Shelke from three hundred feet high Wazir cone )
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळकेंचा वाढदिवस यंदा साधेपणाने साजरा होणार; ‘नागरिकांनी भेटीसाठी येऊ नये’, आमदारांचे आवाहन
– महिला आर्थिक सक्षमीकरण आणि ग्राम उद्धार कार्यक्रमांतर्गत शिळींब गावातील महिलांना शेवई बनवण्याचे यंत्र वाटप
– ‘अभिवादन नवदुर्गांना’ । रुपेरी पडद्यापर्यंत पोहोचताना बहरलीये ‘फुलराणी’, अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरचा थक्क करणारा प्रवास