मावळ तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनिल शेळके यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. अशात मराठा आंदोलनाचे मुख्य नेते मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करत आहेत. त्यांनी उपोषणादरम्यान सरकारला आज सायंकाळपर्यंतची वेळ दिली आहे, आणि निर्णय घेण्याची विनंती केली आहे. त्यापार्श्वभूमीवर आज (दि. 1 नोव्हेंबर 2023) मुंबईत सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली. या सर्वपक्षीय बैठकीवेळी बाहेर सर्वपक्षीय आमदारांकडून ठिय्या आंदोलन कऱण्यात आले, ज्यात आमदार सुनिल शेळके यांचाही समावेश होता. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
आमदार शेळके यांच्यासह अन्य आमदारांना आंदोलन करु नये, सरकार योग्य तो मार्ग काढेल, अशी विनंती करण्याचा प्रयत्न अनेक मंत्र्यांनी केला. मात्र सर्वपक्षीय आमदार निर्णयावर ठाम राहिले. आणि मनोज जरांगे पाटलांना समर्थन देत सरकारविरोधातील आंदोलन सुरु ठेवले. अखेर परिस्थिती बिघडते, हे पाहून स्थानिक मुंबई पोलिसांनी आमदारांना ताब्यात घेतले. यात आमदार सुनिल शेळके यांचाही समावेश होता. यावेळी आमदार शेळके खुप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आज उचलून नेले तरी उद्या पुन्हा येऊन बसणार, असा इशारा आमदार शेळकेंनी पोलिसांना दिला. ( Maratha Reservation Movement MLA Sunil Shelke in custody of Mumbai Police )
अधिक वाचा –
– मुंबई-पुणे हायवेवर भीषण अपघात! रुग्णवाहिकेचा स्फोट होऊन गाडीच्या चिंधड्या, महिला पेशंटचा मृत्यू
– Breaking! मराठा आरक्षणासाठी मावळ तालुक्यात विविध पक्षांच्या नेत्यांकडून पदांचे राजीनामे
– मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रक अडवून लुटमार करणारे तीनजण ताब्यात । Maval Crime