व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करा’, राष्ट्रवादी ओबीसी सेलकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पत्र । Pune News

नुकतीच बिहार राज्यामध्ये स्वतंत्रपणे जातनिहाय जनगणना झाली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 17, 2023
in पुणे, ग्रामीण, शहर
ncp-obc-cell

Photo Courtesy : Team Dainik Maval


नुकतीच बिहार राज्यामध्ये स्वतंत्रपणे जातनिहाय जनगणना झाली आहे. तामिळनाडू, छत्तीसगड आणि इतर अनेक राज्यांनी सुद्धा ओबीसी जनगणना केल्या असून त्यांच्या राज्याच्या विकासासाठी त्यांचा उपयोग झालेला आहे. महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करण्याबाबतची गेल्या कित्येक वर्षांपासूनची मागणी प्रलंबित आहे. जनगणना हा विषय केंद्र शासनाशी संबंधित आहे. मात्र इतर मागासवर्गाची स्वतंत्र जनगणना करण्यासाठी केंद्र सरकारने असमर्थता व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्य शासनाने बिहार सरकारप्रमाणे ओबीसींची स्वतंत्र जनगणना करावी. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

देशातील अनुसुचित जाती व जमातींची जातवार जनगणना करून दीडशे वर्षे होत आलेली आहे. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने फक्त अनुसुचित जाती व जमाती यांची जातनिहाय तर इतर सर्वांची एकत्रित गणना करण्याचे धोरण स्विकारले. यातुन इतर मागासवर्गीय (ओबीसी) वंचित राहिले. सन 1994 साली केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने ओबीसी जनगणना कशी आवश्यक आहे. ते सरकारला तिसऱ्यांदा पटवून दिले. सन 2010 साली 100 खासदारांनी ओबीसी जनगणनेचा ठराव केला. त्यासाठी देशाचे नेते सन्माननीय श्री शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय प्रयत्न केले गेले होते. त्यातुन 2011 ते 2014 मध्ये केंद्राने सामाजिक व आर्थिक जातगणना केली. मात्र त्याची आकडेवारी राज्यांना दिली गेलेली नाही.

देशात सन 2021 सालच्या नियमित जनगनणेचे काम अद्याप व्हायचे आहे, त्यात ही जातनिहाय गणना करावी अशी आमची सातत्याने मागणी आहे. बिहारप्रमाणेच महाराष्ट्र शासनाने इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांची जातीनिहाय जनगणना करावी, अशी राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष राज राजापुरकर आणि तसेच तमाम ओबीसी संघटनांची मागणी आहे. या मागणीचा गांभिर्याने विचार करत जातीनिहाय जनगणना करण्यासाठी राज्य शासनाकडे शिफारस करावी. ( caste wise census in maharashtra demand by ncp obc cell to pune collector )

अशा आशयाचे निवेदन पुणे जिल्हा व शहर राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी ओबीसी सेल च्या वतीने पुणे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम मॅडम यांना निवेदन देत मागणी केली. यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष अतुल राऊत, पुणे शहराध्यक्ष दिपक जगताप, कार्याध्यक्ष संजय जकाते, पुणे शहर उपाध्यक्ष विश्वास ननावरे, नगरसेवक मंगेश खैरे, पुरंदर तालुकाध्यक्ष प्रकाश भालेराव, कोथरूड विधानसभा अध्यक्ष संतोष चव्हाण, शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष अभिमन्यू धोत्रे, कॅन्टोन्मेंट विधानसभा अध्यक्ष मंगेश हिरणवार, हडपसर विधानसभा अध्यक्ष जयश्री आदमाने, शिवाजीनगर विधानसभा कार्याध्यक्ष हरिदास पवार, वेल्हा तालुका अध्यक्ष लक्ष्मण तावरे, मावळ तालुका वरिष्ठ उपाध्यक्ष सोमनाथ धोंगडे, वडगाव शहर अध्यक्ष मयुर गुरव सह ओबीसी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा –
– बाळासाहेब ठाकरे यांचा 11वा स्मृतीदिन : शिवसेनाप्रमुखांच्या आयुष्यातील हे महत्वाचे टप्पे माहितीयेत का? नक्की वाचा
– चंदनवाडी शाळेतील विद्यार्थ्यांची दिवाळी गोड; लायन्स क्लबकडून शैक्षणिक साहित्यांसह फराळ वाटप

– ‘रयत विद्यार्थी विचार मंच’कडून परंदवडी गावात गरीब – कष्टकरी आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

शिंदे सरकारचा मोठा निर्णय! ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी आता मिळणार 25 लाखांचा निधी, वाचा सविस्तर

Next Post

शिवसेनाप्रमुखांचा स्मृतीदिन : सोमाटणे फाटा इथे शिवसेना ठाकरे गटाकडून रुग्णांना फळे वाटप

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Balasaheb-Thackeray-Memorial-Day

शिवसेनाप्रमुखांचा स्मृतीदिन : सोमाटणे फाटा इथे शिवसेना ठाकरे गटाकडून रुग्णांना फळे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Thousands of fish die in Indrayani River at Dehu serious concerns ahead of Ashadhi Wari

देहूतील पवित्र इंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू ; आषाढी वारी पालखी सोहळ्यापूर्वी वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

June 15, 2026
Asphalting of four connecting roads in ​​Keshavnagar area Vadgaon Maval has been completed

वडगावच्या केशवनगरमधील ‘गोखले ले आऊट’ भागातील चार जोडरस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण; नागरिकांनी मानले लोकप्रतिनिधींचे आभार

June 15, 2026
BJP Pawan Maval Mandal organizational review meeting held at Shivne Maval

भाजपा पवन मावळ मंडळाची शिवणे येथे संघटनात्मक आढावा बैठक संपन्न

June 15, 2026
Gram-Panchayat-Election

मावळ तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण; पावसाळ्यानंतर निवडणुकीचे बिगूल वाजणार?

June 15, 2026
Talegaon Dabhade Conclusion of Shri Swami Samarth Namjap ceremony held to mark Adhik Maas

तळेगाव दाभाडे : अधिक मासानिमित्त १ कोटी २५ लाख श्री स्वामी समर्थ नामजप सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सांगता

June 14, 2026
New District Executive Committee of Bharatiya Janata Party BJP Mahila Morcha Pune North District announced

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, पुणे उत्तर जिल्ह्याची नूतन जिल्हा कार्यकारिणी जाहीर; कार्यकारिणीत मावळचा दबदबा

June 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.