व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘सफर गड दुर्गांची’, वडगावमध्ये लहान मुलांसाठी किल्ले अभ्यास मोहिमेचे आयोजन, जाणून घ्या सविस्तर

मोरया प्रतिष्ठान वतीने वडगाव शहरातील मुलांसाठी "सफर गड दुर्गांची"चे आयोजन करण्यात आले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 19, 2023
in लोकल, शहर
Fort-Study

Photo Courtesy : Team Dainik Maval


मोरया प्रतिष्ठान वतीने वडगाव शहरातील मुलांसाठी “सफर गड दुर्गांची”चे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक महिन्याला एक गड दुर्ग पाहण्याची अभ्यासपूर्ण मोहीम या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण करत असताना त्यांनी जवळपास 350 ते 400 गडदुर्ग ताब्यात घेऊन, जिंकून, उभारून स्वराज्य स्थापन केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा इतिहास आपण पुस्तकातूनच वाचतो. लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर गड दुर्गांशिवाय पर्याय नाही. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

एवढं मोठं स्वराज्य निर्माण करत असताना त्यांना किती कष्ट सोसावे लागले असतील. त्यांच्या व मावळ्यांच्या शौर्यगाथा, महाराजांचा गणिमी कावा, मुसूदध्येगिरी, शाहीथाट, जनतेबद्दल असलेली आपुलकी हे सर्वच या दुर्गांच्या प्रत्येक दगडात मातीच्या कणात अजूनही साठलेले आहे. मुलांना किंवा भावी पिढीला याची जाणीव करून देण्यासाठी हि गडदुर्गांची सहल अतिशय अल्प दरात दर महिन्यासाठी सुरू करण्यात येत आहे. ( Fort Study Mission for Children in Vadgaon Maval City )

या सहलीमुळे मुलांची शारीरिक तंदुरुस्ती, शारीरिक क्षमता, बुद्धीमत्ता, इतिहासाची जाण त्यामुळे येणारा आत्मविश्वास, आपला पूर्वजांबद्दल आदर, आपल्या मराठ्यांची संस्कृती व इतिहास या सर्व गोष्टी सहलीमधून अनुभवायला मिळणार आहे. या सहलीमध्ये अतिशय अनुभवी इतिहास संशोधकांबरोबर मुलांना सहज समजेल अशा सोप्या भाषेमध्ये गडदुर्गांबद्दलची माहिती व इतिहास सांगितला जाणार आहे. सर्व सहली अतिशय अल्प दरात मोरया प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करत आहे. इयत्ता ४ थी ते १० वी पर्यंत इयत्तेतील मुले-मुली यात सहभाग घेऊ शकतात.

नावनोंदणी मंगळवार दि २८ नोव्हेंबर २०२३ रोजी पर्यंत करणे आवश्यक आहे;
सहल निघण्याची तारीख : रविवार ३ डिसेंबर २०२३ रोजी;
महत्वाचे –
१) प्लास्टिक पिशवी आणू नये.
२) एक वेळचा जेवनाचा डबा घरून घेणे.
३) दोन पाणी बाॅटल घेणे.
४) पायामध्ये शूज असणे आवश्यक आहे.
५) पालकांचे मोबाईल नंबर देणे बंधनकारक आहे.
६) दर महिन्याला निघणाऱ्या सहलीचे नियोजन फोनद्वारे अथवा इतर माध्यमांद्वारे कळविण्यात येईल याची नोंद घ्यावी.
७) दर महिन्यातून एकदा निघणाऱ्या “सफर गड दुर्गांची” या उपक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्म स्थळ असलेल्या किल्ले शिवनेरी पासून होणार आहे.
८) प्रवेश फी फक्त १५०/- रुपये असणार आहे.
आयोजक –
मयूर ढोरे (माजी नगराध्यक्ष वडगाव नगरपंचायत)
अबोली ढोरे (अध्यक्षा – मोरया महिला प्रतिष्ठान, वडगाव)

अधिक वाचा –
– उर्से गावात किल्ले बनवा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; हुबेहुब किल्ला साकारणाऱ्या चिमुकल्यांना बक्षिसे वाटप
– स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त लोणावळा शहरात शिवसेना ठाकरे गटाकडून विविध कार्यक्रम
– लोणावळा शहरात ‘वॉटरब्लॉक’, शनिवारी दुपारपासून पाणीपुरवठा राहणार बंद, वाचा संपूर्ण सुचना


dainik maval jahirat

Previous Post

राजपुरी – नवलाख उंब्रे मार्गावर कंटेनर आणि दुचाकीचा अपघात, एकाचा मृत्यू, कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल

Next Post

‘…अन्यथा शासनाला गावकारभाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल’, गावखेड्याच्या अपेक्षा पूर्ण करण्याची सरपंच परिषदेची मागणी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
sarpanch-parishad-pune

'...अन्यथा शासनाला गावकारभाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल', गावखेड्याच्या अपेक्षा पूर्ण करण्याची सरपंच परिषदेची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.