ग्रामपंचायत ही राज्य व्यवस्थेचा पाया आहे. ती एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे. घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर कर हे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. ग्रामपंचायतीला शासनामार्फत वेगवेगळ्या योजनेअंतर्गत निधी जरी मिळत असला तरीही तो निधी संबंधित योजनेच्या कामासाठीच खर्च करावा लागतो. त्यामुळे अनेकदा कर वसूली नसेल तर ग्रामपंचायती आर्थिक अडचणी येतात. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
ग्रामपंचायतीच्या पट्ट्या भरणे, तसेच काही कर असल्यास ते भरणे हे कोणत्याही सुजान नागरिकाचे कर्तव्य आहे. परंतू, अनेकजण तसे करताना दिसत नाही. वर्षोनुवर्षे पाणीपट्टी, घरपट्टी सारखे कर थकवले जातात. परंतू, हे कर चुकवणाऱ्या किंवा वेळेवर भरणा न करणाऱ्या नागरिकांसाठी महत्वाची सुचना आहे. याचे कारण तुम्ही जर ग्रामपंचायतीच्या कराचा भरणा केला नाही तर तुमच्यावर कारवाई देखील होऊ शकते.
- महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व ग्रामपंचायत कर व फी नियम (सुधारणा) 2015 यामधील तरतुदीनुसार ग्रामपंचायतीचा कर हा प्रत्येक मालमत्ता धारकाला भरावाच लागतो, तो कधीही माफ होत नाही. तसेच थकबाकी रकमेवर दरवर्षी 5 % व्याजसुद्धा भरावे लागते. तसेच ग्रामपंचायत कराच्या रकमेच्या वसुलीसाठी अशी मालमत्तेची जप्तीसुद्धा करू शकते. आणि अशा कार्यवाहीचा खर्चही वसूल केला जातो.
कर न भरल्यामुळे एक तर आपली कराची रक्कम वाढत जाते, त्यावरील अतिरिक्त दंडही भरावा लागतो, आणि जप्तीसुद्धा होऊ शकते, आणि एव्हढे होऊनही शेवटी कराची रक्कम भरावीच लागते. त्यापेक्षा जर आपण आपला कर दरवर्षी आर्थिक वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यात भरला तर आपल्याला घरपट्टीच्या चालू रकमेवर 5 % सूट सुद्धा मिळते. मार्चपर्यंत भरला तर दंडही लागत नाही आणि आपण ग्रामपंचायतला कधीही कुठल्याही कामासाठी गेलो तरी कुणी आपल्याला कर भरा म्हणून तगादाही लावणार नाही.
ग्रामपंचायत कर
पाणीपट्टी व घरपट्टी वेळेत न भरल्यास थकबाकीदारांवर खटला दाखल होऊन लोक अदालतीत पाठवला / ग्रामपंचायत अधिनियमानुसार मालमत्तेवर बोजा चढवला जाऊ शकतो.
नियमानुसार कर भरला नाही म्हणुन कोणत्याही दाखल्यासाठी नागरिकांची अडवणूक करता येत नाही.
कर भरणे नागरिकांची जबाबदारी आहे.
— Subhash Shelke – सुभाष शेळके (@suvishelke) November 18, 2023
गावाला दैनंदिन पाणीपुरवठा करणे, पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती व देखभाल करणे, ब्लिचिंग पावडर खरेदी, वीजबिल भरणे, कर्मचारी पगार करणे, गावातील स्वच्छता, किरकोळ रस्ते दुरुस्ती, गटार दुरुस्ती, रस्त्यावरील दिवाबत्तीची सोय करणे, कार्यालयीन खर्च यासारखी अनेक नित्याची कामे ग्रामपंचायतीला करावी लागतात. ही कामे करण्यासाठी ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळणे आवश्यक असते. घरपट्टी आणि पाणीपट्टी यातून जमा होणाऱ्या निधीतून वरील व इतर आवश्यक कामे ग्रामपंचतीस करणे शक्य होते. त्यामुळे प्रत्येक मालमत्ताधारक यांनी आपला घरपट्टी, पाणीपट्टी कर,व इतर करांचा भरणा त्या त्या आर्थिक वर्षात करणे आवश्यक आहे. कराच्या रूपाने ग्रामस्थ ग्रामपंचायतीला आर्थिकदृष्ट्या बळकट करत असतात आणि त्यातूनच एका सक्षम गावाची निर्मिती होत असते.
अधिक वाचा –
– IPS सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा पोलिसांची 5 जणांवर कारवाई, जाणून घ्या कारण
– राष्ट्रवादीचे नेते बापूसाहेब भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तन, पाहा ठिकाण आणि वेळ
– मंडल अधिकारी आणि तलाठ्यांना मिळणार हक्काची कार्यालये; तालुक्यात होणार 7 मंडलाधिकारी आणि 43 तलाठी कार्यालये