व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘मावळातील विकास कामांचा दर्जा राखा, अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करा’ – खासदार श्रीरंग बारणे

मावळमध्ये विविध विकास कामे सुरू आहेत. या कामांना गती द्यावी. दर्जेदार, टिकाऊ स्वरूपाची कामे करावीत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 24, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
MP-Shrirang-Barne

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळमध्ये विविध विकास कामे सुरू आहेत. या कामांना गती द्यावी. दर्जेदार, टिकाऊ स्वरूपाची कामे करावीत. कामाच्या दर्जात कोणत्याही प्रकारची तडजोड खपवून घेतली जाणार नाही. दर्जाहीन कामे झाल्यास चौकशी केली जाईल असा इशारा मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे दिला. तसेच मावळातील विविध कार्यालयातील अधिकारी वेळेवर जागेवर हजर नसतात. त्यामुळे अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ तालुक्यातील विविध विभागाची तालुकास्तरीय आढावा बैठक शुक्रवारी खासदार बारणे यांनी घेतली. वडगाव येथील पंचायत समितीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीला तहसीलदार विक्रम देशमुख, गट विकास अधिकारी सुधीर भागवत, तळेगांव दाभाडे नगरपरिदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे धनराज दराडे, कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ, विद्युत विभागाचे शिवाजी चव्हाण, गट विकास शिक्षण अधिकारी एस. आर. वाळूंज, शिवसेना तालुका प्रमुख राजु खांडभोर, उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, साहेबराव कारके, सुनिल ढोरे, अंकुश देशमुख, विशाल हुलावळे उपस्थित होते.

मावळातील 114 गावांमध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठाची कामे सुरू आहेत. त्यासाठी मोठा निधी मिळाला आहे. 27 गावातील कामे पूर्ण झाली आहेत. काही गावातील कामांच्या दर्जाबाबत सरपंच, नागरिकांनी तक्रारी केल्या. खासदार बारणे या तक्रारींची दखल घेतली. निविदेतील अटी-शर्तीप्रमाणे कामे करावीत. कामाचा दर्जा राखावा. नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये. तत्काळ निराकरण करावे. यापुढे कामांच्या दर्जाबाबत नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. ( MP Shrirang Barne held review meeting of various departments in Maval taluka )

कार्ला फाटा ते एकविरा देवीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत खासदार बारणे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही त्यांनी दिली. रस्ते, पाणी, वीज, जातीचे दाखले याबाबत नागरिकांच्या तक्रारी येऊ देऊ नका, वेळेवर आणि दर्जेदार सुविधा पुरवाव्यात. तसेच सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत सुरू असलेल्या शाळांच्या कामाचाही आढावा त्यांनी घेतला. कंपन्याकडून सीएसआर निधी उपलब्ध करून दिला जाईल असेही खासदार बारणे म्हणाले.

आता बायोमेट्रिक पध्दतीने हजेरी –

ग्रामीण भाग असल्याने अधिकारी कार्यालयात वेळेवर येताना दिसत नाहीत. विलंबाने येतात. त्यांना वेळेचे गांभीर्य नाही. अधिकारी जागेवर नसल्याने नागरिकांना ताटकळत थांबावे लागते. त्यामुळे मावळातील सर्व शासकीय कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करावी. त्याबाबत सर्व कार्यालयात मशीन बसविण्याची सूचनाही खासदार बारणे यांनी केली.

अधिक वाचा –
– मोठी कारवाई! अन्न व औषध प्रशासनाच्या धडक मोहिमेत साडेसहा लाखाचा पानमसाला जप्त
– महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मावळ तालुक्यातील ‘या’ दोन पैलवानांची चमकदार कामगिरी; होतोय कौतूकाचा वर्षाव
– ग्रामपंचायत निवडणूक लढवलेल्या सर्व उमेदवारांसाठी महत्वाची सुचना, ‘या’ तारखेपर्यंत खर्च सादर करा, अन्यथा…


dainik maval jahirat

Previous Post

महत्वाची बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024 मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, वाचा सविस्तर

Next Post

मोठी बातमी! पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर 2 दिवस ट्राफिक ब्लॉक, ‘या’ गाड्या होणार रद्द, वाचा सविस्तर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pune-Lonavla-Local

मोठी बातमी! पुणे - लोणावळा रेल्वे मार्गावर 2 दिवस ट्राफिक ब्लॉक, 'या' गाड्या होणार रद्द, वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.