व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणासाठी डीपीआर करा, वंदे भारतसह विविध एक्सप्रेसला लोणावळ्यात थांबा द्या’ – खासदार श्रीरंग बारणे

मावळ लोकसभा मतदारसंघातील रेल्वेच्या प्रश्नांबाबत राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि रेल्वे विभागाचे कार्यकारी संचालक देवेंद्र कुमार यांच्या बरोबर खासदार बारणे यांची बैठक झाली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 14, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर, शहर
Railway-Issues-In-Maval-Loksabha

Photo Courtesy : Team MP Shrirang Barne


पिंपरी – पनवेल ते पुणे रेल्वे मार्गावर लोकल आणि वेगवान रेल्वे गाड्या धावण्यासाठी नवीन रेल्वे मार्ग बनविण्याची आवश्यकता आहे. मार्ग विस्तारीकरण करण्याकरीता नव्याने डीपीआर तयार करावा. या मार्गावर लोकल सुरु झाल्यास रेल्वेला फायदा होईल. वंदे भारतला लोणावळ्यात आणि लोणावळा आणि कर्जत स्थानकांवर विविध एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ लोकसभा मतदारसंघातील रेल्वेच्या प्रश्नांबाबत राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि रेल्वे विभागाचे कार्यकारी संचालक देवेंद्र कुमार यांच्या बरोबर खासदार बारणे यांची बैठक झाली. मावळमधील रेल्वे संदर्भातील विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली. पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ झाले आहे. तसेच पनवेल ते कर्जत रेल्वे मार्गाचे निर्माणीकरणाचे काम सुरु आहे. कर्जत ते लोणावळा दरम्यानच्या मार्गालगत नवीन रेल्वे लाईनचा सर्व्हे, सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) बनवावा. पुणे ते लोणावळा दरम्यान तिस-या, चौथ्या ट्रॅकला सहा वर्षांपूर्वी मान्यता मिळाली. परंतु, अद्यापही कामाला सुरुवात झाली नाही. महारेल काम सुरु करण्यासाठी तयार असून रेल्वे मंत्रालयाच्या सहकार्याची त्यांना आवश्यकता आहे. पनवेल ते पुणे दरम्यान रेल्वे मार्गावर लोकल आणि वेगवान रेल्वे गाड्यांसाठी नवीन रेल्वे मार्गाची निमिर्ती करावी. पनवेल ते पुणे दरम्यान लोकल रेल्वे सुरु केल्यास आर्थिक फायदा होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांक्षी योजनेतून स्वदेश निर्मित वंदे भारत एक्सप्रेस सुरु केली आहे. मुंबई-पुणे-सोलापूर दरम्यान एक्सप्रेस धावत आहे. मुंबई, ठाणे, कल्याणनंतर थेट पुण्यात थांबा आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात वंदे भारतला एकाही ठिकाणी थांबा नाही. लोणावळा मोठे पर्यटन स्थळ आहे. लाखोंच्या संख्येने पर्यटक लोणावळ्यात येतात. त्यामुळे वंदे भारतला लोणावळ्यात थांबा देण्याची मागणी खासदार बारणे यांनी केली. ( MP Shrirang Barne Meeting with Raosaheb Danve and Devendra Kumar Regarding Various Railway Issues In Maval )

लोणावळा, कर्जत रेल्वे स्थानकांवर ‘या’ गाड्यांना थांबा द्या –

कोरोनानंतर सर्व लांबच्या रेल्वे गाड्या सुरु झाल्या आहेत. परंतु, कोरोनापूर्वी असलेले थांबा बंद केले आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. विद्यार्थी, महिला, शेतकरी, व्यापारी, पर्यटकांचे अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कर्जत रेल्वे स्थानकांवर कोयना, हैद्राबाद, कोणार्क, चेन्नई, गदक, सिद्धेश्वर, कन्याकुमारी, कोल्हापूर-अहमदाबाद, मुंबई-पधानपूर, कोल्हापुर-मुंबई सह्याद्री एक्सप्रेस आणि पुणे-कर्जत पैसेंजर या 11 गाड्यांना थांबा द्यावा. तसेच लोणावळा स्थानकावर मद्रास सीएसएसटी सुपरफास्ट, एलटीटी सीबीइ, अहमदाबाद हमसफर, एलटीटी मद्रास, एनसीजे सीएसएमटी, जोधपुर, हुसैन सागर एक्सप्रेस, मुंबई सीएसएमटी सुपरफास्ट, दादर पदुचेरी, सीएसएमटी चेन्नई एग्मोरे मेल, सिद्धेश्वर आणि मुंबई-लातुर एक्सप्रेसला पूर्वीप्रमाणे थांबा देण्याची मागणीही खासदार बारणे यांनी केली.

पुणे-लोणावळा दरम्यान दुपारच्या वेळेत लोकल सुरु करा

कोरोना साथ सुरु होण्यापूर्वी पुणे-लोणावळा दरम्यान लोकल गाड्यांचे संचालन व्यवस्थित सुरु होते. कोरोना साथीच्या कालावधीत रेल्वेची सेवाच बंद करण्यात आली. कोरोनानंतर आता देशात पूर्वीप्रमाणे सर्व रेल्वे सुरु झाल्या आहेत. कोरोना साथीच्या अगोदर पुणे-लोणावळा दरम्यान सकाळी साडे अकरा ते दुपारी अडीच वाजताच्या कालावधीत दोन लोकल गाड्या चालवल्या जात होत्या. त्या गाड्यांचे संचालन आता बंद आहे. पुणे-लोणावळा मार्गावर विद्यार्थी, महिला, शेतकरी, नोकरदार, पर्यटक अशा अनेक घटकातील हजारो प्रवासी प्रवास करतात. तळेगाव आणि पिंपरी-चिंचवड मधील औद्योगिक वसाहतींमध्ये दुसऱ्या शिफ्टच्या कर्मचाऱ्यांना कामावर येण्यासाठी साडेअकरा ते अडीच वाजताच्या कालावधीत येणाऱ्या लोकलचा मोठा फायदा होतो. त्यामुळे दुपारच्या वेळेत लोकल गाड्या सुरु करण्याची मागणी खासदार बारणे यांनी केली.

अधिक वाचा –
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओझर्डे ट्रॉमाकेअर केंद्राजवळ पुन्हा ब्लॉक; ‘या’ काळात मुंबई लेन राहणार बंद, पाहा वाहतुकीचे नियोजन
– ताम्हिणी घाटात प्लस व्हॅली परिसरातील कुंडात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू; शिवदुर्ग टीमचे साहसी रेस्क्यू ऑपरेशन
– ‘विद्यार्थ्यांनी भविष्यातील विविध क्षेत्रात वर्चस्व निर्माण करण्यासाठी स्पर्धा परीक्षांवर भर द्यावा’ – माजी मंत्री बाळा भेगडे


Previous Post

भाजपाच्या नवमतदार नोंदणी अभियानाला व्ही.पी.एस. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद । Lonavla News

Next Post

अभिमानास्पद! परंदवडीच्या मा. सरपंच सुलभा भोते यांना ‘भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल एक्सिलेंट सरपंच’ पुरस्कार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Parandavadi-Sarpanch-Sulabha-Bhote-Maval

अभिमानास्पद! परंदवडीच्या मा. सरपंच सुलभा भोते यांना 'भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल एक्सिलेंट सरपंच' पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.