व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, August 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवना विद्या मंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न; ‘विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक वृत्ती बाळगावी’ – संतोष खांडगे

'आजचे विद्यार्थी हे आधुनिकतेच्या जगतात वावरणारे आहेत. त्यामुळे त्यांनी संशोधनात्मक वृत्ती बाळगावी,' असे मत नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी पवनानगर येथे व्यक्त केले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 23, 2023
in ग्रामीण, लोकल
pavananagar-maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


‘आजचे विद्यार्थी हे आधुनिकतेच्या जगतात वावरणारे आहेत. त्यामुळे त्यांनी संशोधनात्मक वृत्ती बाळगावी,’ असे मत नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी पवनानगर येथे व्यक्त केले. पवना विद्या मंदिर, लायन शांता माणेक पवना ज्युनिअर कॉलेज आणि कै. सौ. मिराबाई दशरथ भोंगाडे पवना प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण नुकतचे संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष खांडगे बोलत होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

स्नेहसंमेलनाचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे संस्थापक उद्योजक विलास काळोखे, दादासाहेब उऱ्हे, संस्थेचे जेष्ठ संचालक दामोदर शिंदे, महेशभाई शहा, पवना शिक्षण संकुलाचे पालक सदस्य सुनिल भोंगाडे, काशिनाथ निंबळे,कालेचे उपसरपंच छायाताई कालेकर, माजी मुख्याध्यापक भगवान शिंदे, अंजली दौंडे,दशरथ ढमढेरे, बबन तांबे, महादेव थोरात,वारूचे सरपंच हरिभाऊ निंबळे, माजी सरपंच मारुती काळे विश्वनाथ जाधव, लाला गोणते शालेय समितीचे सदस्य प्रल्हाद कालेकर, नारायण कालेकर, जमीन हक्क परिषदेचे अध्यक्ष ज्ञानदेव सोनवणे, माजी सरपंच भरत घारे बाळासाहेब मसुरकर, डॉ. सुभाष साबळे, डॉ.संजय बुटाला, विजय ठाकर, श्रीकांत मोहोळ, नितीन तुपे, पंढरीनाथ वरघडे, विष्णु शेंडगे, शहाजी कडु, एकनाथ पोटफोडे विलास वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना खांडगे म्हणाले की, सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचे युग आहे. त्यासाठी त्यांना शालेय पातळीवर तंत्रज्ञानयुक्त शिक्षण गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतः अद्यावत असणे गरजेचे आहे. याप्रसंगी बोलताना विलास काळोखे म्हणाले की, जिद्द, बुद्धी व मन बळकट असते तो कधीच पराभूत होत नाही. त्यासाठी मेहनत करावी यश आपोआपच आपल्याकडे खेचले जाईल. ( Pavana Vidya Mandir Annual Symposium and Prize Distribution Pavananagar Maval )

क्रीडा स्पर्धेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना यावेळी पारितोषिके देण्यात आली. यावेळी माजी विद्यार्थी सभागृहासाठी शाळेचे माजी विद्यार्थी विनायक राजीवडे व शाळेचे जेष्ठ अध्यापक राजकुमार वरघडे सर यांनी प्रत्येकी 51 हजार रुपयांची देणगी दिली. यावेळी त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे यांनी केले. सुत्रसंचालन पुनम दुश्मन व कांचन जाधव, आभार प्राथमिक विभागाचे प्रमुख गणेश साठे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वी करण्यासाठी प्राचार्य भाऊसाहेब आगळमे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका अर्चना शेडगे, शिक्षक प्रतिनीधी गणेश ठोंबरे शिबीर प्रमुख वैशाली वराडे, मिनल खैरे, संदिप शिवणेकर, शिक्षकेतर प्रतिनिधी बाळासाहेब सातकर यांच्यासह सर्व अध्यापकांनी केले होते.

विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम संपन्न –

विद्यार्थ्यांनी आपली नृत्यातुन कला सादर करत पाहुण्यांचे मने जिंकुन घेतले. विद्यार्थ्यांनी विविध नृत्य सादर करून मान्यवरांची दाद मिळवली. पवनांकुंर हस्तलिखिताचे प्रकाशन सचिव संतोष खांडगे व शिक्षणविस्तार शोभाताई वहिले यांचे शुभहस्ते करण्यात आले. विद्यार्थांच्या कला गुणांना वाव मिळावा, यासाठी विज्ञान दालन, कला दालन, रांगोळी दालन व ग्रंथ दालन निर्माण करण्यात आले होते. पाहुण्यांचे शुभहस्ते दालनांची उद्घाटने करण्यात आली. संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांनी विविध विभागांतील उत्तम कामाबद्दल शिक्षक, शिक्षकेतर व विद्यार्थी यांचे अभिनंदन करुन कौतुक केले. पुढील वर्षापासून हस्तलिखिताचे संस्था पातळीवर बक्षिस देण्याचे जाहीर केले.

अधिक वाचा –
– वडगावजवळ गॅरेजमध्ये सुरु होता जुगाराचा अड्डा, पोलिसांच्या धाडीत 7 जण गजाआड, हजारोंचा मुद्देमाल जप्त
– नाताळ, नववर्ष आणि शौर्य दिन : पुणे जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना बंदोबस्तासाठी विशेष अधिकार प्रदान, वाचा नियम
– वडगावात श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त गुरूचरित्र वाचन पारायण सोहळा; महिला भक्तांची लक्षणीय उपस्थिती


dainik maval jahirat

Previous Post

मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा! 20 जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण करणार, अंतरवाली सराटीपासून पायी चालत जाणार

Next Post

तळेगाव दाभाडे येथील सुनिल उकाळे यांची राष्ट्रीय मराठा पार्टीच्या मावळ लोकसभा मतदारसंघ अध्यक्षपदी नियुक्ती

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Talegaon-Dabhade-Sunil-Ukale

तळेगाव दाभाडे येथील सुनिल उकाळे यांची राष्ट्रीय मराठा पार्टीच्या मावळ लोकसभा मतदारसंघ अध्यक्षपदी नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
MLA Sunil Shelke urgent meeting held to resolve issue regarding Gevhande crematorium

आमदार सुनील शेळके यांनी पाळला शब्द ; गेव्हंडे स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक

August 4, 2026
Marathi Journalist Sangh Maval Taluka New Executive Committee announced

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

August 4, 2026
MLA Sunil Shelke efforts land transferred to talegaon nagarparishad for Andhra Dam water project

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश ; आंध्रा धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

August 4, 2026
ISO Rating of Zilla Parishad Schools in Mundhavare Valak Wadiwale village in maval taluka

मुंढावरे, वळक, वाडीवळे येथील जिल्हा परिषद शाळांना आयएसओ मानांकन

August 4, 2026
Cyber ​​security and anti-drug awareness campaign by Vadgaon Maval Police

Vadgaon Maval : वडगाव मावळ पोलिसांकडून सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थविरोधी जनजागृती

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.