लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली होती की, वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे शिवणे आणि मळवंडी ढोरे परिसरातील हॉटेल चालक हे त्यांच्या हॉटेलमध्ये अवैधपणे दारूविक्री करत आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
त्यामुळे परिसरातील तरुण युवकांवर वाईट परिणाम होत आहेत. त्यावरून सत्यसाई कार्तिक यांनी बुधवारी, दिनांक 27 डिसेंबर रोजी त्यांचे कार्यालयाकडील डीबी पथकाला मिळालेल्या बातमीचे ठिकाणी पाठवले. त्यानंतर पथकाने मळवंडी ढोरे (ता. मावळ) येथील 1) हॉटेल जगदंब व मौजे शिवणे येथील 2) हॉटेल पाटीलवाडा मटण खानावळ व 3) हॉटेल कैलास चायनीज अशा तीन ठिकाणी वेगवेगळ्या वेळी पथकाने छापे टाकले. ( Illegal sale of alcohol Vadgaon Maval Police action on Hotel Chinese Center )
ह्या टाकलेल्या छाप्यात नमूद हॉटेलचे चालक यांच्या ताब्यातून एकूण 19,815 रूपये किमतीचा अवैध, विनापरवाना विक्री करण्यासाठी ठेवलेला दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडगाव मावळ पोलीस स्टेशन इथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमच्या विविध कलमान्वये 3 स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सपोनि सचिन राऊळ, पोसई शुभम चव्हाण, पोसई भारत भोसले, पोहवा नितेश (बंटी) कवडे, पोना रईस मुलानी व वडगाव मावळ स्टेशन कडील पोलीस कर्मचारी यांचे पथकाने केली आहे.
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी! कोर्टाकडून आर्थिक दुर्बल घटकांचे आरक्षण मान्य, शेकडो मराठा उमेदवारांचा भरतीचा मार्ग मोकळा
– धाडसाचं कौतूक, धैर्याला सॅल्यूट.! स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता सर्पमित्रांकडून जाळीत अडकलेल्या विषारी नागाला जीवदान
– इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत आढावा बैठक; इंद्रायणी नदीत जाणारे दूषित पाणी तातडीने रोखा – मंत्री दीपक केसरकर