व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिवजयंती जल्लोषात साजरी होणार! प्रशासनाची जोरदार तयारी, जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व विभागांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश । Shiv Jayanti 2024

दरवर्षी शिवभक्तांची वाढती संख्या पाहता सर्व विभागांनी समन्वयाने आगामी शिवजयंती उत्सव यशस्वी करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिलेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 3, 2024
in पुणे, ग्रामीण, शहर
shiv-jayanti-photo

Photo Courtesy : Team Dainik Maval


दरवर्षी शिवभक्तांची वाढती संख्या पाहता सर्व विभागांनी समन्वयाने आगामी शिवजयंती उत्सव यशस्वी करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिलेत. वाहनतळ व्यवस्था, वाहतूक आराखडा आदींसह शिवभक्तांच्या सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजनांवर विशेष लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले. जुन्नर येथे किल्ले शिवनेरी येथे आयोजित करण्यात येणाऱ्या शिवजयंतीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य आशाताई बुचके, जुन्नर आंबेगावचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, जुन्नर तहसीलदार रवी सबनीस आदी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

डॉ. देशमुख म्हणाले की, पोलीस विभाग, वनविभाग, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग (एएसआय), सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जुन्नर नगरपरिषदेने संयुक्तरित्या वाहनतळासाठी आरक्षित करावयाच्या जागांची पाहणी करुन त्याप्रमाणे आराखडा करावा. शिवनेरी पायथा तसेच पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांच्यावेळी गर्दी व्यवस्थापनासाठी पोलीस विभागाने वाहतूक आराखडा तयार करावा. ( review meeting of pune district administration regarding planning of shiv jayanti 2024 )

डॉ. देशमुख पुढे म्हणाले, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे दर्शन सुरु असतानाही शिवजन्मस्थानाचे दर्शनाची रांग सुरु राहता येईल का याबाबत चर्चा करुन उपाययोजना कराव्यात. पुरातत्व विभागाने शिवजन्मस्थान वास्तू तसेच परिसराची स्वच्छता करावी. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने रोषणाई आणि सजावट करावी. नागरिकांना सुरक्षिततेबाबत सूचना देण्यासाठी संबंधित विभागाने प्रवेशद्वारांच्या ठिकाणी सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणा तसेच सीसीटीव्ही बसविण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. किल्ल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने कायमस्वरुपी ब्रॉडबँड लाईन घेण्याबाबत प्रस्ताव करावा जेणेकरुन वाय-फाय यंत्रणेच्या माध्यमातून शिवजयंती महोत्सवाचे थेट प्रक्षेपण करणे शक्य होईल.

शिवनेरीवर सौर पॅनेलद्वारे कायमस्वरुपी वीज देण्याबाबत प्रस्ताव –
शिवनेरी किल्ल्यावर कायमस्वरुपी वीज उपलब्ध होण्याच्यादृष्टीने सौर पॅनेल बसविता येतील का हे महाऊर्जाकडून तांत्रिक व व्यवहार्यता तपासणी करुन घ्यावी. याबाबत एएसआयसह सर्व विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी. किल्ले शिवनेरीवर नव्याने कायमस्वरुपी निर्माण करावयाच्या सुधारणांसाठी निधीचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले.

  • गडावर एखाद्या भक्ताबाबत आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास उपाययोजना म्हणून आवश्यक वैद्यकीय साधनांसह प्राथमिक उपचारांसाठी तीन- चार खाटांची व्यवस्था करावी. तसेच दरवर्षीप्रमाणे गडाच्या रस्त्यावर नियोजित ठिकाणी आरोग्य पथके नेमावीत. यासह जुन्नर ग्रामीण रुग्णालय आणि अन्य खासगी रुग्णालयातही आवश्यक खाटा राखीव ठेवाव्यात. हृदयाशी संबंधित उपचारांसाठी तज्ज्ञ डॉक्टर नेमावेत.

परिवहन मंडळाने अधिकच्या बसेसची व्यवस्था करावी, किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यांवर दिव्यांची व्यवस्था करावी. सर्व उत्सव व्यवस्थित होईल यासाठी दरवर्षीप्रमाणे प्रभावी नियंत्रण कक्ष स्थापन करावा. स्थानिक स्वराज्य संस्था, वनविभागाने स्वच्छतेच्या अनुषंगाने पुरेशा फिरत्या शौचालयांची व्यवस्था करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

पंचायत समिती तसेच अन्य विभागांनी पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी दरवर्षीपेक्षा अधिक टँकरची व्यवस्था तसेच आरोग्य विभागामार्फत पाणी स्रोतांचे टीसीएलद्वारे निर्जंतुकीकरण, पाण्याची वेळोवेळी तपासणी करावी, असे मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण म्हणाले.  तर, किल्ल्यावर जात असताना प्रवेशद्वारांच्या ठिकाणी मोठी गर्दी होत असल्याने भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तसेच पोलीस प्रशासनावरही मोठा ताण निर्माण होते. त्यामुळे प्रवेशद्वारांच्या ठिकाणी येणाऱ्या व जाणाऱ्या भक्तांसाठी वेगळी रांग करण्यासाठी या कालावधीत भक्कम बॅरिकेटींगची व्यवस्था एएसआयने निर्माण करावी, असे पोलीस अधीक्षक गोयल यावेळी म्हणाले.

आमदार बेनके तसेच जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य श्रीमती बुचके यांनी वीजपुरवठा, स्वच्छता आदींच्या अनुषंगाने सूचना दिल्या. यावेळी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने गतवर्षीपेक्षा अधिक कार्यक्रमांचे नियोजन केल्याचे पर्यटन विभागाच्या उपसंचालक शमा ढोक- पवार यांनी सांगितले. बैलगाडा शर्यत, कुस्ती, मॅरेथॉन, दुर्गोत्सव- हेरिटेज वॉक, टेंट सिटी, वडज व कुकडी धरण येथे वॉट स्पोर्ट्स, पॅराग्लायडींग, हॉट एअर बलून आदी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले. त्याअनुषंगाने पर्यटन विभागाने त्यांना आवश्यक सुविधाची मागणी करावी तसेच त्यासाठी संबंधित विभागाला निधी उपलब्ध करुन द्यावा. पर्यटन विभागाने सर्व विभागांकडून आवश्यक त्या परवानग्या घ्याव्यात, असेही डॉ. देशमुख म्हणाले.

अधिक वाचा –
– द्रुतगती मार्गावर औंढे पुलाजवळ भीषण अपघात, टेम्पोतील दोघांचा जागीच मृत्यू । Accident On Mubai Pune Expressway
– आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामासाठी आता ‘बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार’, जाणून घ्या । Balasaheb Thackeray Arogya Ratna Award
– ‘विकेल ते पिकेल’ अभियानाअंतर्गत तळेगाव दाभाडे शहरात ‘शेतकरी आठवडी बाजार’ सुरु, आमदार शेळकेंच्या हस्ते उद्घाटन । Talegaon Dabhade


dainik maval jahirat

Previous Post

माजी उपपंतप्रधान, प्रखर हिंदुत्ववादी नेते लालकृष्ण आडवाणी यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन । Bharat Ratna to Lal Krishna Advani

Next Post

समाज कार्यात अग्रेसर असलेल्या एकता प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकेचे आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते प्रकाशन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
mla-sunil-shelke

समाज कार्यात अग्रेसर असलेल्या एकता प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकेचे आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

horrific accident occurred at Kune Nama in Lonavala 16-year-old boy riding two-wheeler died on the spot

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’

October 17, 2026
Pune District Collector office MLA Sunil Shelke his associates and RTI activist Accusations and police complaints

जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी

October 17, 2026
Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.