व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, April 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘पवना नदीत दुषित पाणी सोडणे थांबवा, नाहीतर…’, बेबडओहोळ येथील गंगा पेपर मिल कंपनीला युवक काँग्रेसचे निवेदन । Maval News

बेबडओहोळ (ता. मावळ) स्थित गंगा पेपर मिल इंडिया प्राव्हेट लिमिटेड कंपनीला मावळ तालुका युवक काँग्रेसच्या वतीने निवदेन देण्यात आले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 3, 2024
in लोकल, ग्रामीण
Maval-Taluka-Youth-Congress

Photo Courtesy : Team Dainik Maval


बेबडओहोळ (ता. मावळ) स्थित गंगा पेपर मिल इंडिया प्राव्हेट लिमिटेड कंपनीला मावळ तालुका युवक काँग्रेसच्या वतीने निवदेन देण्यात आले आहे. ‘गंगा पेपर मिल कंपनीकडून प्लांटमधील दुषित पाणी हे पवना नदीत सोडले जात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून जिवसृष्टीलाही धोका निर्माण होत आहे. त्यामुळे कंपनीला दुषित पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा करण्याबाबत निवेदन दिले आहे,’ अशी माहिती तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश वाघोले यांनी दिली. यावेळी पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कौस्तुभ ढमाले उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

काय आहे निवेदन?
‘गंगा पेपर मिल इंडिया प्राव्हेट लिमिटेड कंपनी बेबडओहोळ (ता. मावळ). आपण आपल्या कंपनीचे दुषित पाणी पवना नदीत सोडत आहात. वेळोवेळी आपल्याला गावकऱ्यांनी आणि इतरांनी सांगून, विनंती करून देखील आपण आपल्या दुषित पाण्याची योग्य सोय केली नाही. ते पाणी पवना नदीत मिश्रित होऊन तेच दुषित पाणी पुढे गाव, शेती, जनावरे आदींच्या वापरात येते. त्यातून रोगराई पसरत आहे. कंपनीने दुषित पाण्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी, अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीने कंपनीला टाळे लावण्यात येईल.’ असे निवेदन आणि निवेदनातून इशारा युवक काँग्रेसच्या वतीने कंपनीला देण्यात आला आहे. ( Maval Taluka Youth Congress Letter To Ganga Paper Mill India Private Limited Company at Bebadohol )

अधिक वाचा –
– वडगाव शहरात लहान मुलामुलींसाठी मल्लखांब प्रशिक्षण वर्गाची सुरूवात । Vadgaon Maval
– कामशेत – पवनानगर मार्गावर गंभीर जखमी आणि मृतावस्थेत आढळले तरस, अज्ञात वाहनाने धडक दिल्याचा अंदाज । Maval News
– द्रुतगती मार्गावर औंढे पुलाजवळ भीषण अपघात, टेम्पोतील दोघांचा जागीच मृत्यू । Accident On Mubai Pune Expressway


Previous Post

महत्वाचे! मावळ तालुक्यात सोमवारपासून ‘शासन आपल्या दारी’ अभियान, प्रत्येक गाव आणि शहरासाठी दिवस राखीव, वाचा अधिक

Next Post

भंडारा डोंगर तीर्थ क्षेत्र विकासासाठी प्रशासनाची आढावा बैठक; गायरान आणि वनविभागाच्या जागेबाबत महत्वाचे निर्देश

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
bhandara-dongar-development

भंडारा डोंगर तीर्थ क्षेत्र विकासासाठी प्रशासनाची आढावा बैठक; गायरान आणि वनविभागाच्या जागेबाबत महत्वाचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Fire and safety training by fire brigade at My Home Society in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेतील ‘माय होम सोसायटी’मध्ये अग्निशमन दलाकडून फायर अँड सेफ्टीचे प्रशिक्षण

April 21, 2026
LPG-Gas

वडगाव शहरात देखील पंचवीस दिवसांत सिलिंडर मिळावा ; नगरसेवक अजय भवार यांची मागणी

April 20, 2026
Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

प्रस्तावित एमआयडीसीला करुंज, बऊर, ब्राह्मणवाडी येथील स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम

April 20, 2026
Lek-Ladki-Yojana

लेक लाडकी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात ९ हजाराहून अधिक मुलींना लाभ

April 20, 2026
Case registered against four people including principal in death of student at Tolani Institute in Induri Maval

मावळातील इंदुरी येथील तोलानी इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थी मृत्यू प्रकरणी प्राचार्यांसह चौघांवर गुन्हा दाखल ; ‘ती’ एक चूक पडली महागात

April 20, 2026
Abandoned vehicles

वडगाव मावळ पोलीस ठाणे परिसरातील बेवारस वाहने मूळ मालकांनी सात दिवसांत घेऊन जाण्याचे आवाहन

April 19, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.