व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

माजी उपपंतप्रधान, प्रखर हिंदुत्ववादी नेते लालकृष्ण आडवाणी यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन । Bharat Ratna to Lal Krishna Advani

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे, तसेच आपण लालकृष्ण आडवाणी यांचे याबाबत अभिनंदन केले असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 3, 2024
in देश-विदेश
Bharat-Ratna-to-Lal-Krishna-Advani

Photo Courtesy : Team Dainik Maval


Bharat Ratna to Lal Krishna Advani : भारताचे माजी उपपंतप्रधान, तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि भारतीय राजकारणाच्या इतिहासात प्रखर हिंदुत्ववादी नेते अशी ओळख असलेले लालकृष्ण आडवाणी यांना यंदाचा भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः एक्सद्वारे (ट्विट करून) ही माहिती दिली आहे, तसेच आपण लालकृष्ण आडवाणी यांचे याबाबत अभिनंदन केले असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे. (  मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. पंडीत नेहरू, डॉ, राजेंद्र प्रसाद, लालबहादुर शास्त्री, इंदिरा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, अटलबिहारी वाजपेयी अशा अनेक राजकारण्यांना आजवर हा पुरस्कार मिळाला आहे. देशाच्या राजकीय परंपरेत अतुलनीय योगदान देणाऱ्या अनेक दिग्गज राजकीय व्यक्तिमत्वांना आजवर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यानंतर आता हा पुरस्कार भाजपाचे वरीष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना देण्यात येणार आहे. आडवाणी हे सध्या सक्रीय राजकारणापासून दूर आहेत. Lal Krishna Advani To Be Honoured With Bharat Ratna Announces PM Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘एक्स’वर पोस्ट (ट्विट) –

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाल्याबद्दल एक पोस्ट केली आहे. ज्यात त्यांनी लिहिलंय की, ‘मला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. मी त्यांच्याशी संवाद साधला असून या सन्मानाने सन्मानित झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. आमच्या काळातील सर्वांत प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असलेल्या आडवाणी यांचे भारताच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान आहे. ग्राऊंड लेव्हलवरून त्यांनी त्यांच्या कामाला सुरुवात करून उपपंतप्रधान पदी विराजमान होऊन देशाची सेवा करण्यापर्यंत त्यांचा प्रवास होता. गृहमंत्री आणि सूचना आणि प्रसारण मंत्री रुपानेही त्यांनी त्यांची प्रतिमा तयार केली. त्यांचा संसदेतील सहभाग नेहमीच अनुकरणीय आणि समृद्ध अंतर्दृष्टीने भरलेले आहे.’

I am very happy to share that Shri LK Advani Ji will be conferred the Bharat Ratna. I also spoke to him and congratulated him on being conferred this honour. One of the most respected statesmen of our times, his contribution to the development of India is monumental. His is a… pic.twitter.com/Ya78qjJbPK

— Narendra Modi (@narendramodi) February 3, 2024

लालकृष्ण आडवाणी यांनी 2002 ते 2004 या दरम्यान भारताचे 7 वे उपपंतप्रधान म्हणून काम केले. अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत त्यांनी 60 वर्षे राजकीय स्तरावर काम केले. आडवाणी भाजपाचे संस्थापक सदस्य असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आहेत. आडवाणी हे सर्वाधिक काळ गृहमंत्री आणि लोकसभेत सर्वाधिक काळ विरोधी पक्षनेते राहिले आहेत. भाजपाचे 2009 च्या निवडणूकीत आडवाणी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार होते. 90 च्या दशकात रथयात्रेद्वारे राममंदिरासाठी त्यांनी मोठे आंदोलन उभारले होते, तसेच राममंदिर निर्माण कार्यात इतिहासात त्यांचे योगदान मोठे आहे. देशस्तरावर एक प्रखर हिंदुत्ववादी नेते अशी त्यांची कार्यकाळात ओळख होती. ते आता 96 वर्षांचे असून सध्या सक्रीय राजकारणापासूनअलिप्त आहेत.

अधिक वाचा –
– महत्वाचे! मावळ तालुक्यात सोमवारपासून ‘शासन आपल्या दारी’ अभियान, प्रत्येक गाव आणि शहरासाठी दिवस राखीव, वाचा अधिक
– मोठी बातमी! आमदार सुनिल शेळकेंचे पक्षातील वजन वाढले, अजितदादांकडून शेळकेंना थेट राज्यस्तरीय जबाबदारी, लगेच वाचा । MLA Sunil Shelke
– वडगाव शहरात लहान मुलामुलींसाठी मल्लखांब प्रशिक्षण वर्गाची सुरूवात । Vadgaon Maval


dainik maval jahirat

Previous Post

भंडारा डोंगर तीर्थ क्षेत्र विकासासाठी प्रशासनाची आढावा बैठक; गायरान आणि वनविभागाच्या जागेबाबत महत्वाचे निर्देश

Next Post

शिवजयंती जल्लोषात साजरी होणार! प्रशासनाची जोरदार तयारी, जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व विभागांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश । Shiv Jayanti 2024

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
shiv-jayanti-photo

शिवजयंती जल्लोषात साजरी होणार! प्रशासनाची जोरदार तयारी, जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व विभागांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश । Shiv Jayanti 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Groundbreaking ceremony for three road projectsincluding Talegaon-Chakan-Shikrapur elevated highway

मावळच्या कनेक्टिव्हिटीला नवी गती ! तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्गासह तीन रस्ते प्रकल्पांचे शनिवारी भूमिपूजन

July 17, 2026
order imposing Section 163 in Lonavala rural area has been revoked all tourist spots are now open to visitors

मोठी बातमी! लोणावळा ग्रामीण परिसरातील कलम १६३ लागू केलेला आदेश रद्द; सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी विनाअट खुली

July 17, 2026
warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.