व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

जुन्नर विधानसभेचे चार टर्मचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचे निधन, 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, पवारांकडून शोक व्यक्त । Vallabh Benke Passed Away

जुन्नर विधानसभेचे सध्याचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांचे ते वडील होते. सोमवारी (दि. 12) सायंकाळी 4 वाजता हिवरे बुद्रुक (ता. जुन्नर ) येथे वल्लभ बेनके यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. Junnar Vidhansabha Former MLA Vallabh Benke Passed Away.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 12, 2024
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे
Vallabh-Benke

Photo Courtesy : Team Dainik Maval


पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) एक जुणे जाणते नेतृत्व आणि पवार कुटुंबीयांचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी आमदार वल्लभ बेनके (Vallabh Benke) यांचे रविवारी (दि. 11) रात्री उशीरा निधन झाले. मागील काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती. त्यांच्यावर चाकण येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली, ते 74 वर्षांचे होते. बल्लभ बेनके यांनी जुन्नर विधानसभेचे अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले होते. तसेच जुन्नर विधानसभेचे सध्याचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांचे ते वडील होते. सोमवारी (दि. 12) सायंकाळी 4 वाजता हिवरे बुद्रुक (ता. जुन्नर ) येथे वल्लभ बेनके यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

वल्लभ बेनके यांना विधानसभेची सलग सहा वेळा उमेदवारी मिळाली. त्यापैकी ते चार वेळा आमदार म्हणून निवडून आले. 1985 ते 2009 या कालावधीत त्यांनी आमदारकी भूषवली. कुशल संघटक, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाची जाण असणारा आणि प्रशासनावर पकड असणारा अभ्यासू नेता, सर्व सामान्य कार्यकर्त्यावर जिवापाड प्रेम करणारा, मुत्सद्दी नेता अशी त्यांनी तालुक्यात ओळख निर्माण केली होती. धरणग्रस्तांच्या प्रश्नांसाठी त्यांनी जवळपास दोन वर्ष संघर्ष केला. वल्लभ बेनके यांनी त्यांच्या कार्यकाळात कांदळी येथे औद्योगिक वसाहतीची स्थापना केली. लेण्याद्री आणि ओझर देवस्थानच्या परिसर विकासासाठी निधी मिळवून दिला. नारायणगाव येथे टोमॅटोचे खरेदी विक्री बाजार केंद्र सुरू केले. प्रशासनावर पकड असणारा नेता म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. (Junnar Vidhansabha Former MLA Vallabh Benke Passed Away)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांच्या निधनानं शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी लढणारं, जुन्नर तालुक्यासह पुणे जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं आहे. पुणे जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. मी… pic.twitter.com/MBvmoJnPY6

— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 11, 2024

अधिक वाचा –
– इंद्रायणी नदी प्रदूषणावर खासदार श्रीरंग बारणे यांनी संसदेत उठवला आवाज । Indrayani River Pollution Video
– वारकरी शिक्षण संस्थेसाठी 5 कोटींचा निधी देणार, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; आळंदी येथे बंकटस्वामी सदनाचे लोकार्पण
– धक्कादायक! मृत झालेल्या बिबट्याच्या पायाचा पंजा आणि नखे कापून नेली, अवयव चोरीप्रकरणी वन विभागाच्यावतीने गुन्हा दाखल । Pune News


dainik maval jahirat

Previous Post

शेतकरी ते ग्राहक थेट विक्री योजनेअंतर्गत आंदर मावळमधील भोयरे गावात आठवडे बाजाराचे उद्धाटन!

Next Post

वडगावात 1 मे रोजी सामुदायिक विवाह सोहळा, नवजोडप्यांना मिळणार अनेक वस्तू, ‘या’ तारखेपर्यंत करता येणार नोंदणी । Vadgaon Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
marriage

वडगावात 1 मे रोजी सामुदायिक विवाह सोहळा, नवजोडप्यांना मिळणार अनेक वस्तू, 'या' तारखेपर्यंत करता येणार नोंदणी । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.