मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीतील उमेदवार मारूती तुकाराम असवले यांनी आपल्या माघारीची घोषणा केली असून महायुतीच्या उमेदवारांना आपला जाहीर पाठींबा दिला आहे. तसेच पत्र त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे. मारूती असवले हे खरेदी विक्री संघात क वर्गातून उमेदवार होते. परंतू त्यांनी आता प्रत्यक्ष निवडणूकीतून माघार जाहीर केली असून महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. दिनांक 25 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया होणार असून त्यात महायुतीच्या पॅनलला मतदारांनी मतदान करावे, असे आवाहनही असवले यांनी केले आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
मारूती असवले यांनी महायुतीला पाठिंबा देणारे पत्र महायुतीच्या उमेदवारांना दिले असून हेच पत्र प्रसिद्धीस दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप व शिवसेना या महायुतीच्या सहकार पॅनलचे उमेदवार किरण हुलावळे यांच्यासह अमोल केदारी, मारूती असवले, बाळासाहेब कोकाटे, भीमराव पिंगळे, अनिल असवले, भूषण असवले, चंद्रकांत वाघमारे, गणपत असवले यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. (Maval Taluka Kharedi Vikri Sangh Election 2024 Maruti Aswale Gave support To Mahayuti candidates)
असवले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘मी श्री. मारुती तुकाराम असवले रा. टाकवे बु!! ता. मावळ जि. पुणे येथील रहिवाशी असुन मावळ तालुका खरेदी – विक्री सहकारी संस्था खडकाळेची संचालक मंडळ पंचवार्षीक निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला असल्याने मी क वर्ग प्रतिनिधी या जागेसाठी उमेदारी अर्ज दाखल केला होता. परंतु सदर निवडणुकीमध्ये मला माझा उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा होता; परंतु मला पोहोचण्यासाठी उशीर झाल्याने निवडणुक निर्णय अधिकारी यांनी माझा उमेदवारी अर्ज मागे न घेता मला निवडणुक चिन्ह दिले.’
‘तरी मला निवडणुक लढवायची नाही. माझा महायुतीचे उमेदवार माणिक मारुतराव गाडे, किरण दौलतराव हुलावळे व गणेश मारुती विनोदे यांना पाठिंबा देत आहे. तरी माझ्या चिन्हावर शिक्का न मारता विमान या चिन्हावर शिक्का मारुन महायुतीचे उमेदवारांना बहुमताने विजय करावे’, अशी विनंती या पत्राद्वारे केली आहे.
अधिक वाचा –
– पवन मावळमधील शिळींब गावात शिवजयंती जल्लोषात साजरी; विविध सांस्कृतिक कार्यक्रम, कीर्तनासाठी पंचक्रोशीतील शिवभक्तांची हजेरी
– कात्रजमधून अपहरण केलेल्या तरुणाची लोणावळ्यातून सुटका, खंडणीसाठी केले होते अपहरण । Pune News
– समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षेत श्री एकविरा विद्या मंदिर कार्ला शाळेच्या विद्यार्थ्यांचा डंका, दमदार कामगिरीसह टॉप फाईव्हमध्ये स्थान