व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! मावळ लोकसभेसाठी संजोग वाघेरे हेच ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार? उद्धव ठाकरे यांचे जाहीर सभेत वक्तव्य – पाहा व्हिडिओ

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विविध मतदारसंघांना भेटी देत आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 4, 2024
in मावळकट्टा, महाराष्ट्र
Sanjog-Waghere-mava-loksabha

Photo Courtesy : Team Dainik Maval


शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सध्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विविध मतदारसंघांना भेटी देत आहेत. आज (दि. 4) मावळ लोकसभा (Maval Lok Sabha) मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचा झंझावात पाहायला मिळाला. उद्धव ठाकरे यांनी मावळ लोकसभेत आज तीन जाहीर सभा घेतल्या. यातील पनवेल (Panvel) येथील सभेत बोलताना ठाकरेंनी मावळ लोकसभा मतदारसंघासाठी संजोग वाघेरे पाटील (Sanjog Waghere) हे अधिकृत उमेदवार असतील, असे सुचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे संजोग वाघेरे यांच्या उमेदवारीच्या घोषणेसह उद्धव ठाकरे यांनी लोकसभेचे रणशिंग फुंकल्याचे बोलले जात आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

Novel NIBR Ads

संजोग वाघेरे यांच्या रुपाने चांगला पर्याय दिला – ठाकरे
‘शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या मागे सर्वजण आता निष्ठेने एकत्र आले आहेत. मी साध्या कार्यालयाच्या उद्घाटनाला येथे आलो तर एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे. तर विजयाच्या मिरवणुकीला किती गर्दी जमा होईल? संजोग वाघेरे यांच्या रूपाने तुम्हाला चांगला पर्याय दिला आहे. एक मर्द तुम्हाला दिला आहे. आपल्याकडे काहीही नसताना संजोग वाघेरे हे आपल्याकडे आले. ते सत्ता आणण्यासाठी आपल्या पक्षात आले,’ असे उद्धव ठाकरे पनवेल येथील सभेत म्हणाले. ( Sanjog Waghere Will Be Shiv Sena Uddhav Thackeray Party Candidate In Maval Lok Sabha Constituency )

जनसंवाद । पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे । पनवेल – #LIVE https://t.co/hkaMWyFXVu

— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) March 4, 2024

अनंत गिते यांच्याकडूनही उमेदवारीचा उल्लेख –
पनवेल येथील सभेत उद्धव ठाकरे यांच्यापूर्वी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी देखील मावळच्या उमेदवाराचा उल्लेख केला. अनंत गीते यांनी आपल्या भाषणात मावळ लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या नावाचा उल्लेख केला. अनंत गीते यांनी म्हटले की, जशी मला रायगड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे, तशीच संजोग वाघेरे यांची देखील उमेदवारी निश्चित झाली आहे.

उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका –
मावळ लोकसभेतील सभांमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारवर जोरदार टीका केली. भारतीय जनता पक्षाचे सरकार या देशात पुन्हा निवडून आले तर या देशाची ही शेवटची निवडणूक ठरेल, असे म्हणत ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. मी पुन्हा येईल या देवेंद्र फडणवीस यांच्या वाक्यावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली. पुन्हा येण्याचा आत्मविश्वास असेल तर पक्ष का फोडतात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तुमच्यावरील संकटाच्या काळात तुमच्या सोबत उभ्या राहिलेल्या शिवसेनाप्रमुखांची शिवसेना तुम्ही संपवायला निघालात, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

Novel NIBR Ads

अधिक वाचा –
– ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान : अंतिम निकाल जाहीर, शासकीय गटात साखरा शाळा प्रथम, खाजगी गटात एस्पेलियर हेरिटेज स्कूलची बाजी
– मावळ दौऱ्यापूर्वीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! एकनाथ शिंदे यांची जबरदस्त खेळी, खासदार बारणेंना होणार फायदा । Maval Lok Sabha
– तळेगाव दाभाडे शहरात आमदार सुनिल शेळकेंचा झंझावात! एका दिवसात 17 ठिकाणी भूमिपूजन आणि नागरिकांशी संवाद


dainik maval jahirat

Previous Post

पुण्यातील वाहतूककोंडीवर जालीम उपाय! पुण्यातून जाणाऱ्या आणि येणाऱ्या जड वाहनांना शहरात प्रवेशबंदी । Pune News

Next Post

IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची देवघर येथील जुगार अड्ड्यावर कारवाई! 1 लाखांचा मुद्देमाल जप्त, 9 जणांविरोधात गुन्हा दाखल

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Lonavala-rural-police

IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची देवघर येथील जुगार अड्ड्यावर कारवाई! 1 लाखांचा मुद्देमाल जप्त, 9 जणांविरोधात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Farmers face digital struggle to purchase fertilizer new app system proving to be headache

खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची ‘डिजिटल’ कसरत ; नवीन ॲप प्रणाली ठरतेय डोकेदुखी

June 11, 2026
Land to be provided for Patrakar Bhavan Press Club in all districts said Minister Chandrashekhar Bawankule

सर्व जिल्ह्यांत पत्रकार भवनासाठी जागा देणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

June 11, 2026
Expand outreach down to village level to strengthen Congress party organizational base in Maval

मावळात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी गावपातळीपर्यंत संपर्क वाढवा; जिल्हाध्यक्ष कमलाकर सातव यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 11, 2026
Opposition party opens dedicated office at Vadgaon Nagar Panchayat Maval

वडगाव नगरपंचायतीत विरोधी पक्षाचा स्वतंत्र कक्ष सुरू ; नागरिकांना प्रश्न मांडण्यासाठी मिळाले नवीन व्यासपीठ

June 11, 2026
Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.