व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

धमकीचं राजकारण! शरद पवारांची टीका आणि आमदार सुनिल शेळकेंचे प्रत्युत्तर, वाचा सविस्तर । Maval MLA Sunil Shelke & Sharad Pawar

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आज (दि. 7) लोणावळा (ता. मावळ) येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्यासाठी आले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 7, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर, शहर
sharad-pawar-sunil-shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे आज (दि. 7) लोणावळा (ता. मावळ) (Lonavala Maval) येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्यासाठी आले होते. यावेळी शरद पवार यांनी मावळे आमदार सुनिल शेळके (MLA Sunil Shelke) यांना जाहीररित्या खडसावले. शरद पवार यांना आमदार सुनिल शेळके हे कार्यकर्ते पदाधिकारी यांना धमकावत असल्याची माहिती देण्यात आली किंवा तसे त्यांच्या पर्यंत पोहोचले, त्यावरून त्यांनी आपल्या मनोगतात आमदार सुनिल शेळके यांचा समाचार घेतला. पवारांच्या या टीकेला आमदार सुनिल शेळके यांनीही लगेचच प्रत्युत्तर दिले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

काय म्हणाले शरद पवार?
आमदार सुनिल शेळके यांना इशारा देताना शरद पवार म्हणाले की, ‘तू आमदार कोणामुळे झाला, तुझ्या सभेला कोण आलं होतं? त्यावेळी तुझ्या पक्षाचा अध्यक्ष कोण होता? तुझ्या फॉर्म, चिन्ह यासाठी नेत्याची सही लागते ती सही माझी आहे. ज्यानं ही सही केलीये त्याचेच कार्यकर्ते तुम्हाला निवडून आणण्यासाठी राबले, घाम गाळला त्यांनाच आज तुम्ही दमदाटी करता. माझी तुम्हाला विनंती आहे की, एकदा तुम्ही दमदाटी केलीत, आता बास्स झालं. पुन्हा जर असं काही केलं तर शरद पवार म्हणतात मला. मी खरंतर तर या रस्त्यानं जात नाही पण जर या रस्त्यानं जाण्याची स्थिती कोणी निर्माण केली तर त्याला सोडतही नाही.” असा सज्जड दमच जणू शरद पवार यांनी आमदार शेळकेंना दिला.

शरद पवारांच्या टीकेला सुनिल शेळकेंचे प्रत्युत्तर –
शरद पवार यांच्या लोणावळ्यातील भाषणानंतर काही वेळातच आमदार सुनिल शेळकेंनी वडगाव मावळ येथे पत्रकार परिषद घेऊन त्यावर स्पष्टीकरण दिले. ‘मेळाव्याचे आयोजन करणाऱ्यांनी शरद पवारांना काही माहिती दिली. मावळमधले शेकडो कार्यकर्ते अजित पवारांना सोडून शरद पवारांबरोबर यायला तयार आहे, तुम्ही त्यासाठी मावळमध्ये या, अशी खोटी माहिती देऊन शरद पवारांना निमंत्रित केले. सुनिल शेळकेंनी कार्यकर्त्यांना कार्यक्रमाला न जाण्याबाबत दमदाटी केल्याचे शरद पवारांना या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शरद पवारांनी त्यावर लगेच प्रतिक्रिया दिली. ते आमच्यासाठी आजही श्रद्धेय आहेत. पण त्यांनी या बाबतीत वक्तव्य करताना शहानिशा करणे अपेक्षित होतं,’ असे सुनिल शेळके म्हणाले.

‘पुरावा द्या.. अन्यथा मी महाराष्ट्रभर सांगेन’
पुढे शेळके म्हणाले की, ‘मी या बाबतीत शरद पवारांना भेटून विचारणार आहे. माझी काय चूक झाली आहे, हे त्यांनी सांगावे. कार्यकर्त्यांनी त्यांना दिलेली माहिती खरी की खोटी, हे त्यांनी तपासून पाहायला हवं होतं. पुढच्या 8 दिवसांत मी ज्याला फोन केला किंवा दमदाटी केली, अशी एक तरी व्यक्ती उभी करावी, नाहीतर मी संपूर्ण महाराष्ट्रात सांगणार की शरद पवारांनी मावळमध्ये येऊन माझ्यावर खोटे आरोप केले. शरद पवारांना ज्यांनी माहिती दिली, त्यांनी एकतर पुरावे द्यावेत नाहीतर शरद पवारांनी माझ्या बाबतीत केलेले वक्तव्य खोटं होतं हे सांगावं,’ असे आव्हानच शेळकेंनी पवार यांना केले. ( Sharad Pawar Speech at Lonavala Maval Constituency Ncp Mla Sunil Shelke Slams Sharad Pawar )

 

अधिक वाचा –
– पुण्यातील राष्ट्रीय लोक अदालतीत एकूण 1 लाख 40 हजार प्रकरणे निकाली, तब्बल 369 कोटी 98 लाखांची वसूली । Pune News
– उमरठ येथील ‘नरवीर तानाजी मालुसरे’ यांच्या समाधीस्थळासाठी 10 कोटी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा!
– श्री एकविरा विद्या मंदिर कार्ला शाळेची चमकदार कामगिरी, ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेत तालुक्यात दुसरा क्रमांक


dainik maval jahirat

Previous Post

पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचा शुभारंभ! पिंपरी-चिंचवड ते निगडी मेट्रोचे भूमिपूजन, रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला हिरवा झेंडा । Pune Metro

Next Post

‘मी त्या वाटेने जात नाही आणि गेलो तर सोडत नाही’, शरद पवारांचा आमदार सुनिल शेळकेंना इशारा, काय म्हणाले पवार? वाचा सविस्तर । Sharad Pawar criticizes MLA Sunil Shelke

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
sharad-pawar-on-sunil-shelke-maval-lonavala

'मी त्या वाटेने जात नाही आणि गेलो तर सोडत नाही', शरद पवारांचा आमदार सुनिल शेळकेंना इशारा, काय म्हणाले पवार? वाचा सविस्तर । Sharad Pawar criticizes MLA Sunil Shelke

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.