व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, April 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे ग्रामीण भागात हॉटेल्स, रेस्टॉरंट, बिअर बार आदी ठिकाणी कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी, नियम तोडल्यास कारवाई होणार

पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व परमिट रूम, बार तसेच सर्व आस्थापना रात्री 12.30 वाजता पूर्णपणे बंद होतील. तसेच,

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 8, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर, शहर
maharashtra-police

File Image - Team Dainik Maval


पुणे ग्रामीण जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, बिअर बार, परमिट रूम तसेच हुक्का पार्लर यांच्या नियमनासाठी अपर जिल्हा दंडाधिकारी, पुणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 खाली दिनांक 07/03/2024 रोजी पासून प्रतिबंध आदेश निर्गमित केले आहेl. त्याअंतर्गत,

1. पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व परमिट रूम, बार तसेच सर्व आस्थापना रात्री 12.30 वाजता पूर्णपणे बंद होतील.
2. रात्री 12.00 वाजल्यानंतर कुठल्याही प्रकारचे खाद्यपदार्थ अथवा मद्य इत्यादीसाठींची ऑर्डर घेतली जाणार नाही.
3. तसेच ज्या परमिट रूम मध्ये दारू दिली जाते त्या ठिकाणी 18 वर्षाखालील मुलांना प्रवेश असणार नाही तसेच उत्पादन शुल्क विभागाच्या प्रचलित नियमानुसार वयाचे निकष पाळले जातील, विशेषतः 25 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कोणत्याही व्यक्तीला दारू दिली जाणार नाही.
4. सर्व आस्थापनांनी ध्वनी प्रदूषण नियम व नियंत्रण नियम सन 2000 चे काटेकोरपणे पालन करावे.
5. पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व आस्थापनांमधील जे संगीत कार्यक्रम बंद इमारतींमध्ये होतात ते बरोबर रात्री साडेबारा वाजता बंद होतील तसेच सर्व खुले संगीत कार्यक्रमांची वेळ ही रात्री दहा वाजेपर्यंत असेल. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

6. ग्राहकांना बसण्याचे ठिकाणी असलेल्या जागी कुठल्याही प्रकारचे नृत्य करण्याची परवानगी असणार नाही. कारण यामुळे शेजारच्या ग्राहकांना विनाकारण त्रास होऊ शकतो तसेच यातून वाद देखील होऊ शकतात.
7. व्यवसाय कलाकार अथवा डीजे, गायक इत्यादी यांना कार्यक्रमाला बोलवायचे असल्यास त्याबाबत विहित आदेशांचे पालन करावे लागेल.
8. अशा सर्व आस्थापनांमध्ये तसेच आस्थापनांच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही लावणे बंधनकारक आहे. ज्यामध्ये प्रवेश बाहेर पडण्याचा मार्ग, ग्राहक बसण्याची जागा, बार काउंटर इत्यादी जागांचे चित्रीकरण होईल तसेच सर्वसामान्यपणे ज्या ठिकाणी ग्राहकांचा वावर असतो, अशी कुठलीही जागा सीसीटीव्ही शिवाय राहणार नाही.
9. तसेच सदर सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग करण्यासाठी दोन डिव्हीआर लावण्यात यावेत.
10. अशा सर्व आस्थापनांनी सुरक्षिततेच्या अनुषंगाने योग्य ते स्त्री व पुरुष सुरक्षा कर्मचारी नेमावेत जे आस्थापना चालू असण्याचे वेळेमध्ये पूर्णवेळ उपस्थित असतील. तसेच अशा सुरक्षा कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करणे अतिशय आवश्यक आहे. 

11. अशा आस्थापनांमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व महिला व लहान मुले तसेच पुरुष यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही या आस्थापनेच्या व्यवस्थापकावर/ मालकावर (ज्याचे नावावर परवाना आहे ) त्याची असेल.
12. अशा आस्थापनांच्या लगतच्या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत चालेल तसेच ग्राहकांची वाहणे पार्किंग मध्ये लागतील याची जबाबदारी संबंधित व्यवस्थापक मालकांची असेल.
13. अशा आस्थापनांमध्ये जे ग्राहक दारू पितील ते परत जाताना आस्थापनाच्या परिसरांमधून गाडी चालवत जाणार नाहीत याची खात्री करण्याची जबाबदारी ही व्यवस्थापक /मालक यांच्यावर असेल.याबाबतची खात्री करण्यासाठी स्वतंत्र व्यक्ती नेमावेत तसेच आस्थापनाच्या परिसरामध्ये दारू पिऊन वाहन चालवणे हे बेकायदेशीर असल्याबाबत सूचना फलक लावने बंधनकारक आहे.
14. आस्थापनामध्ये गोंधळ किंवा नियंत्रित वर्तन निर्माण करणाऱ्या ग्राहकांना वेळीच समज देणे तसेच त्यांना दारू न देणे व त्यांना वेळीच आस्थापनाच्या बाहेर काढणेची जबाबदारी व्यवस्थापक/ मालक यांची असेल.अशा घटनांची चित्रीकरण करण्यात यावे.
15. वारंवार गोंधळ किंवा अनियंत्रित वर्तन करणाऱ्या ग्राहकांची वेगळी यादी बनवून त्यांना आस्थापना मध्ये प्रवेश नाकारण्यात यावा तसेच अशा व्यक्तींच्या यादींसाठी वेगळी नोंदवही तयार करण्यात यावी.

16. अशा आस्थापना ज्यामध्ये धूम्रपानं परवानगी आहे अशा ठिकाणी नियुक्त विशिष्ट क्षेत्र ज्याला धूम्रपान क्षेत्र( बंद किंवा खुले ) अशा ठिकाणीच धूम्रपान करणेची परवानगी असेल. सदर बाबत कोटपा ॲक्ट, 2003 चे काटेकोरपणे पालन करावे लागेल.
17. हुक्का / शिशा हा कुठलाही आस्थापनामध्ये/सार्वजनिक जागेमध्ये /खाद्यगृहांमध्ये ग्राहकांना सेवनासाठी दिला जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
18. सर्व आस्थापना No Drugs Allowed/ Drugs consumption is banned अशा सूचनांचे फलक लावतील तसेच पोलीस विभागाकडून स्थापनाच्या परिसरामध्ये तपासणी करून अशा प्रकारचे ड्रग्स ग्राहकांना दिले जात नाही याबाबत खात्री करण्यात येईल.
19. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तयार करण्यात आलेले सर्व नियम व नियमांचे तंतोतंत पालन करण्यात यावे.

या व अशाप्रकारच्या विविध सूचनांचे पालन करण्याबाबतचा आदेश जारी करण्यात आला असून पुणे ग्रामीण जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, बिअर बार, परमिट रूम तसेच हुक्का पार्लर यांनी वर नमूद नियमांचे व निर्बंधांचे पालन न केल्यास त्यांच्यावर भारतीय दंड विधान कायद्याचे कलम 188 अन्वये गुन्हा नोंद करण्यात येणार असेलबाबत या आदेशात नमूद केले आहे. तसेच पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्व आस्थापना चालकांना सदरच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत आवाहन केले आहे. ( Prohibitory orders issued under Section 144 in hotels restaurants beer bars etc in rural areas of Pune )

अधिक वाचा –
– धमकीचं राजकारण! शरद पवारांची टीका आणि आमदार सुनिल शेळकेंचे प्रत्युत्तर, वाचा सविस्तर । Maval MLA Sunil Shelke & Sharad Pawar
– पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचा शुभारंभ! पिंपरी-चिंचवड ते निगडी मेट्रोचे भूमिपूजन, रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला हिरवा झेंडा । Pune Metro
– वडगाव शहरासाठी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत 2 कोटी 45 लाखांचा निधी, ‘ही’ कामे लागणार मार्गी । Vadgaon Maval


Previous Post

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन, ‘इथे’ करा संपर्क

Next Post

महाशिवरात्रीच्या दिवशीच घरातील देव्हाऱ्याजवळ नागाचे दर्शन, वन्यजीव रक्षकच्या सर्पमित्रांमुळे अनर्थ टळला – पाहा व्हिडिओ

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
serpent-friend-life-to-cobra-snake

महाशिवरात्रीच्या दिवशीच घरातील देव्हाऱ्याजवळ नागाचे दर्शन, वन्यजीव रक्षकच्या सर्पमित्रांमुळे अनर्थ टळला - पाहा व्हिडिओ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lions Point and Tiger Point closed for tourists on 31st December Lonavala News

लोणावळा शहरात ‘व्हिला’ , ‘बंगलो’ बुकींगचा स्कॅम ? पर्यटकांची फसवणूक होत असल्याने प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा

April 23, 2026
maharashtra Cabinet decision to approve Maharashtra Agricultural Land Rules 2026

मंत्रिमंडळ निर्णय : कमाल जमीन धारणा मर्यादा नियमातील जमिनीच्या भोगवटादार रुपांतरणाच्या अधिमूल्याची पुनर्रचना – वाचा अधिक

April 23, 2026
Yashwantrao Chavan Mumbai Pune Expressway

महत्वाचे ! आज मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणार असाल तर आधी ‘ही’ बातमी वाचा, नंतरच घराबाहेर पडा

April 23, 2026
Maval Taluka kharedi vikri sang demand Fund for Shetkari Bhavan letter to Cooperation Minister

मावळात शेतकरी भवन उभारणीसाठी निधी मिळावा ; मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे सहकार मंत्र्यांना निवेदन

April 22, 2026
Chinmayi Sumit impressive speech at Vasant Lecture Series in Lonavala city

लोणावळा शहरातील वसंत व्याख्यानमालेत चिन्मयी सुमीत यांचे प्रभावी मनोगत ; मातृभाषा मराठी शाळा व संस्कृती जपण्याचे आवाहन

April 22, 2026
gas cylinder line

वडगावचा ‘ग्रामीण’चा शिक्का काढा, शहराप्रमाणेच २५ दिवसात सिलिंडर मिळू द्या ; नगराध्यक्षा अबोली ढोरे यांची मागणी

April 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.