सध्याच्या घडीची एक मोठी बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारने सीएए (CAA) कायदा अर्थात नागरीकत्व सुधारणा कायद्याची अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे सीएए कायदा आता देशभरात लागू होणार आहे. पाच वर्षांपूर्वी संसदेच्या दोन्ही सभागृहात सीएएचा कायदा मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनंतर लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तोंडावर नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारकडून सीएए कायद्याच्या अंमलबजावणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
सरकारने सीएए कायद्याची अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशात नागरिकत्व (सुधारणा) कायदा म्हणजेच सिटीझनशिप अमेंडमेंट अॅक्ट (CAA)बाबत चर्चा सुरू झाली आहे. (Central Government notifies implementation of Citizenship Amendment Act 2019 CAA)
काय आहे सिटीझनशिप कायदा?
सीएए (CAA) नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 ने भारतामध्ये दीर्घकाळ आश्रय घेतलेल्या तीन शेजारी देशांतील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याचा मार्ग खुला केला आहे. या 3 देशांमध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या देशांचा समावेश आहे. या कायद्यात कोणत्याही भारतीयाचे नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद नाही. मग तो कोणताही धर्म असो. या कायद्यामुळे भारतातील मुस्लिम किंवा कोणत्याही धर्माच्या आणि समुदायाच्या नागरिकांच्या नागरिकत्वाला कोणताही धोका नाही, असे सांगण्यात आले आहे.
Central Government notifies implementation of Citizenship Amendment Act (CAA). pic.twitter.com/zzuuLEfxmr
— ANI (@ANI) March 11, 2024
अधिक वाचा –
– राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते लोणावळा येथे शिक्षक संमेलनाचे उद्घाटन; विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्याऐवजी सर्वांगिण प्रगतीची संधी द्या – राज्यपाल
– पवन मावळ भागातील उर्से, आढे, सडवली, बऊर गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते भूमिपूजन । MLA Sunil Shelke
– सराईत मोटारसायकल चोराला अटक, एक दोन नव्हे तब्बल 16 मोटारसायकली हस्तगत, 14 गुन्ह्यांची उकल । Pune Crime