मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमनपदाची निवडणूक आज (दि. 12 मार्च) पार पडली. नुकत्याच झालेल्या मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणूकीतून निवडणूक आलेल्या संचालकांमधून चेअरमन आणि व्हाईस चेअरमनपदाची निवड बिनविरोध झाली. यात खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी शिवाजीराव असवले यांची बिनविरोध निवड झाली. तर, व्हाईस चेअरमनपदी प्रतिस्पर्धी उमेदवाराने अर्ज माघारी घेतल्याने अमोल भोईरकर यांची निवड बिनविरोध झाली. वडगाव मावळ येथे ही निवडप्रक्रिया पार पडली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
वडगाव मावळ येथे आज (दि. 12) महायुतीचे उमेदवार शिवाजीराव चिंधू असवले यांनी चेअरमनपदी अर्ज भरला होता. तर, अमोल तुकाराम भोइरकर यांनी व्हाईस चेअरमनपदी अर्ज भरला होता. प्रत्यक्ष निवडणूकीवेळी दोघांचेच अर्ज असल्याने दोघांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. याप्रसंगी मावळ तालुका महायुतीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. सर्वांनी शिवाजीराव असवले आणि अमोल भोइरकर यांचे अभिनंदन केले आणि सत्कार केला. ( Maval Taluka Kharedi Vikri Sangh Election of post of Chairman and Vice Chairman at Vadgaon )
याप्रसंगी संत तुकाराम सा.का. उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, भाजपाते विधानसभा प्रचार प्रमुख रवींद्र भेगडे, मावळ भाजपा प्रभारी भास्कर म्हाळसकर, मावळ भाजपा तालुका अध्यक्ष दत्तात्रय गुंड, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे माजी संचालक बाळासाहेब नेवाळे, मावळ तालुका रा. काँग्रेस अध्यक्ष गणेश खांडगे, भाजपा कोअर कमिटी अध्यक्ष निवृत्तीभाऊ शेटे, ज्ञानेश्वर दळवी, राजाराम शिंदे आदींसह मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे सर्व संचालक आणि महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सरपंच परिषदेच्या अध्यक्षपदी धामणे गावचे सरपंच अविनाश गराडे । Maval News
– महाविकासआघाडीचा मावळ लोकसभेचा उमेदवार ठरला? पिंपरी चिंचवडमध्ये पार पडली घटक पक्षांची समन्वय बैठक । Maval Lok Sabha
– लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारकडून देशात नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 (CAA) लागू