पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधात मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी आवाज उठवला होता. 2011 साली त्यासाठी मोठे आंदोलन उभारण्यात आले होते. 2011 साली तात्कालीन आघाडी सरकारने बंदिस्त पवना जलवाहिनी विरोधात आंदोलन केलेल्या 117 आंदोलकांवर गुन्हे दाखल केले होते. या आंदोलकांची मंगळवारी निर्दोष सुटका झाली. महत्वाचे म्हणजे या 117 पैकी 27 आंदोलकांचा दरम्यानच्या काळात मृत्यूही झाला आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
गुन्हे दाखल झालेल्या आंदोलकांमध्ये माजी आमदार स्व. दिगंबर दादा भेगडे, माजी खासदार स्व. गजानन बाबर यांचाही समावेश होता. ते देखील तेव्हा आंदोलनामध्ये शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लाऊन लढले होते. त्यांचेही स्मरण या ऐतिहासिक निकालानंतर होत आहे. ही कायदेशीर लढाई तब्बल 13 वर्षे सुरु होती, अखेर मंगळवारी सर्व आंदोलक शेतकऱ्यांच्या बाजूने न्यायालयाने आपला निकाल दिला आणि त्यांची न्यायालयीन प्रक्रियेतून निर्दोष सुटका झाली. ( Acquittal of protestors against Pavana closed water channel maval taluka )
‘मावळ तालुक्यातील नैसर्गिक संसाधनावर सर्वांत पहिला हक्क येथील स्थानिक भूमिपुत्रांचा आहे. मावळवासीयांच्या हक्कावर गदा आणणाऱ्या बंदिस्त पवना जलवाहिनीला विरोध कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. 13 वर्षांपूर्वी आम्ही मावळ वासियांनी मिळून जो लढा उभारला त्यामुळे आजही पवनेचे पाणी मावळातील शेती-वाडी फुलवत आहे. जो पर्यंत बंदिस्त जलवाहिनी हा विषय कायमस्वरूपी बासनात जात नाही तोपर्यंत मी आणि माझे संपूर्ण मावळवासी शांत बसणार नाही हा शब्द देतो.’ – रविंद्र भेगडे (भाजपा)
अधिक वाचा –
– इंद्रायणी महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृतिदिनी अभिवादन । Talegaon Dabhade
– मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी शिवाजीराव असवले बिनविरोध, व्हाईस चेअरमनपदी ‘यांची’ निवड
– ‘एकल भगिनी सक्षमीकरण’ अभियान, मावळ राष्ट्रवादी देणार महिलांना आधार । Maval Taluka NCP