व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शेतकऱ्याकडून 25 हजारांची लाच स्विकारताना तलाठ्याला रंगेहात अटक, मावळ तालुक्यातील खळबळजनक घटना

सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी 25 हजारांची लाच स्विकारताना मावळ तालुक्‍यातील तलाठ्याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 16, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
bribe

File Photo : bribe


सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी 25 हजारांची लाच स्विकारताना मावळ तालुक्‍यातील तलाठ्याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली आहे. ह्या घटनेने मावळ तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सखाराम कुशाबा दगडे (वय 52, तलाठी, सजा करूंज, ता. मावळ) असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. याप्रकरणी वडगाव मावळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडगाव मावळ येथील तहसील कार्यालयामागील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर सोमवारी (दि. 18 मार्च) ही कारवाई करण्यात आली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

Novel NIBR Ads

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शेतकर्‍याच्या शेतीच्या गटाची फोड केल्याची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी आरोपी दगडे यांनी 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी 25 हजार रुपये स्विकारताना दगडे यांना लाचलुचपत विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहात पकडले. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर वडगाव मावळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Talathi Arrested Red-handed By Anti Corruption Bureau While Accepting Bribe From Farmer At Vadgaon Maval )

महसूल विभागाला लागलेले लाचखोरीचे ग्रहण केव्हा संपणार, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित असल्याचे या घटनेतून दिसून आले आहे. मागील वर्षी राज्यात लाचखोरीत पहिल्या क्रमाकांवर राहिलेल्या महसूल विभाग याही वर्षी त्याच स्पीडने पुढे चालला आहे. एकट्या पुणे जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांत महसूल विभागाचे दोन कर्मचारी लाच घेताना पकडले गेलेत. त्यामुळे हा विभाग यावर्षीच्या पहिल्या तिमाहीतच लाचखोरीत अव्वल आला आहे. मावळ तालुक्यातही लाचखोरीचे प्रमाण वाढताना दिसत असून यावर आवर न घातल्यास सामान्यांची पिळवणूक होत राहणार, हे नक्की.

अधिक वाचा –
– मळवली ते कामशेत स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने पुणे-मुंबई रेल्वे सेवा विस्कळीत । Pune Mumbai Railway
– वडगाव मावळ शिवजयंती उत्सव समितीची नवी कार्यकारिणी जाहीर, शिवजन्मोत्सव जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय । Vadgaon Maval
– लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर कामशेत पोलिसांचा रूट मार्च । Kamshet Police Route March


dainik maval jahirat

Previous Post

लोकसभा निवडणूका आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यात पोलिसांचे संचलन । Lonavala Police Route March

Next Post

‘शिर्डी मतदारसंघ साहेबांना सोडा.. नाहीतर मावळ आणि शिरूरमध्ये नोटाला मतदान करू’, भाजपाला कुणी दिलाय हा इशारा? वाचा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Devendra-Fadnavis

'शिर्डी मतदारसंघ साहेबांना सोडा.. नाहीतर मावळ आणि शिरूरमध्ये नोटाला मतदान करू', भाजपाला कुणी दिलाय हा इशारा? वाचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Complete roadworks before the Ashadhi Wari MLA Sunil Shelke demands during monsoon session

आषाढी वारीपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आमदार सुनील शेळके यांची पावसाळी अधिवेशनात मागणी

June 25, 2026
Railway-Track

दापोडी, देहूरोड, मळवली स्थानकांवर ‘लूप लाइन’ टाकण्याचा निर्णय; मध्य रेल्वे प्रशासनाचा लाखो प्रवाशांना दिलासा

June 25, 2026
Demand to reroute power line obstructingthe paragliding hill in Kamshet Maval

कामशेतमधील पॅराग्लायडिंग हिलला अडथळा ठरणाऱ्या वीजवाहिनीच्या मार्गात बदल करण्याची मागणी

June 25, 2026
Ashadhi-Wari

आषाढी वारी २०२६ : देहू ते आळंदी पालखी मार्गाला संतभूमीचा दर्जा देण्याची मागणी

June 24, 2026
MLA Sunil Shelke

पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील शेळके यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती; मावळच्या नेतृत्वाचा राज्यस्तरीय गौरव

June 24, 2026
Rain begins in the Pavana Dam area paddy seedlings get new lease of life bringing relief to farmers

Pawana Dam Rain : पवना धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात; भातरोपाला मिळाली नवसंजिवनी, बळीराजा सुखावला

June 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.